माजी उपमुख्यमंत्र्यांची त्रिशाबद्दल ‘डबल मिनिंग’ टिप्पणी; थलपती विजय यांच्या आमदारांचा तीव्र संताप

माजी उपमुख्यमंत्र्यांनी एका भाषणादरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी अर्थाची टिप्पणी केली. यावरून सर्वच स्तरांतून जोरदार टीका केली जात आहे. थलपती विजय यांच्यावर निशाणा साधताना त्रिशाबद्दल अशी भाषा वापरल्याने नेटकऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.

माजी उपमुख्यमंत्र्यांची त्रिशाबद्दल डबल मिनिंग टिप्पणी; थलपती विजय यांच्या आमदारांचा तीव्र संताप
Thalapathy Vijay and Trisha Krishnan
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2026 | 9:22 AM

तमिळनाडूमध्ये सध्या कावेरी नदीच्या पाणीप्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यादरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असताना स्टॅलिन यांनी थेट अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल असभ्य टिप्पणी केली. त्यांच्या दुहेरी अर्थाच्या या टिप्पणीमुळे आता हा वाद आणखी चिघळला आहे. एकीकडे विजय यांच्या टीव्हीके पक्षाने अशी भाषा अस्वीकार्य असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपनेही याला अश्लील म्हणत स्टॅलिन यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?

उदयनिधी स्टॅलिन हे तंजावरमध्ये कावेरी पाणीप्रश्नाशी संबंधित आंदोलनाचं नेतृत्व करत होते. यावेळी सभेला संबोधित करताना स्टॅलिन यांनी थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. कावेरी पाणी प्रश्नाबद्दल उदयनिधी म्हणाले, “आमचे मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर तोंड उघडत नाहीत. त्यांना आमच्या पक्षावर खोटे खटले दाखल करण्याची जास्त चिंता आहे.” यावेळी गर्दीतून काही जणांना “त्रिशा, त्रिशा..” अशी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा उदयनिधी क्षणभर थांबले, हसले आणि मग टिप्पणी केली की, “पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथे मात्र पोहोचायला हवं. मला कावेरी म्हणायचं होतं.” हे ऐकताच लोकांनी जोरजोरात हसत टाळ्या वाजवल्या.

पहा व्हिडीओ

सभेला उपस्थित असलेल्या लोकांना ही टिप्पणी जेवढी गमतीशीर वाटली, तेवढी ती नेटकऱ्यांना अजिबात वाटली नाही. त्यांनी स्टॅलिन यांच्यावर त्रिशाला उद्देशून दुहेरी अर्थाने टिप्पणी केल्याचा आरोप केला. उदयनिधी स्टॅलिन यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीव्हीकेचे आमदार रेवंत चरण यांनी या वक्तव्याला अत्यंत घृणास्पद म्हटलंय. तर कोणाविरुद्धही अशी भाषा पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कावेरी आंदोलनाला गर्दी जमली नसल्याने लक्ष वेधण्यासाठी ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

भाजपनेही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. उदयनिधी यांचं हे वक्तव्य अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद असल्याचं तमिळनाडू भाजपचे राज्य प्रवक्ते नारायणन तिरुपती म्हणाले. त्यांनी उदयनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. नेटकऱ्यांनीही यावरून स्टॅलिन यांना घेरलं आहे.

थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्यातील नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा आहे. तर विजय यांची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज करताना त्यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us