AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दहशतवादी त्यांची हत्या करणार,’ केंद्रीय मंत्र्याला थेट धमकी आल्याने खळबळ; दिल्लीत सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर!

केंद्रिय मंत्री चिराग पासवान यांना खरोखरच एखाद्या दहशतवादी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिलीय की हे एखाद्या समाजकंटकाचे कृत्य आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होईल असे म्हटले जात आहे.

'दहशतवादी त्यांची हत्या करणार,' केंद्रीय मंत्र्याला थेट धमकी आल्याने खळबळ; दिल्लीत सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर!
sansad bhavan
| Updated on: Sep 01, 2026 | 8:40 PM
Share

केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना अतिरेक्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला एक धमकीचा संदेश मिळाला आहे. त्यात चिराग पासवान यांना अतिरेकी लवकरच ठार करतील असे म्हटले आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर गेल्या आहेत. चिराग पासवान यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

केंद्रिय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चिराग पासवान यांचे सरकारी अतिरिक्त खाजगी सचिव आलोक कुमार सिंग यांनी मंगळवारी केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. यात धमकीच्या मॅसेजवर गांभीर्याने पावले उचल्यात येऊन केंद्रिय मंत्री पासवान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. चिराग पासवान यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

केंद्रिया अन्न प्रक्रिया उद्योग मंत्र्यांचे अतिरिक्त खाजगी सचिव आलोक सिंह यांनी आपल्या पत्रात गृहमंत्रालयाला विनंती केली आहे की चिराग पासवान यांची सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा आढावा घ्यावा अशी मागणी केली आहे. गरज पडल्यास त्यांना आणखी मजबूत सुरक्षा पुरवण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. चिराग पासवान यांचे येत्या दिवसात अनेक सार्वजनिक कार्यक्रम आहेत. त्यामुळे या धमक्यांना गंभीरपणे आणि प्राधान्याने घ्यावे असे आवाहन या पत्रात आलोक सिंह यांनी केले आहे.

थेट मंत्रालयाला मिळाला धमकीचा संदेश

चिराग पासवान यांचे अतिरिक्त खाजगी सचिव आलोक सिंह यांनी सांगितले की मंगळवारी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला दोन नंबर वरुन सही न केलेले संदेश पत्र मिळाले आहेत. हे पत्र उघडले तर त्यात केंद्रिय मंत्र्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यात लिहिले होते की कंट्टर अतिरेकी संघटना लवकरच त्यांची हत्या करतील.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?