AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको नांदायला येईना, नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल; घर बंद करून…एकच खळबळ!

पोलीस ठाण्यात जावे लागले असले तरीही नीरजने पत्नीशी फोनवरून संवाद साधत नाते टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने परत येण्यास नकार दिल्याने तो मानसिकदृष्ट्या खचला होता. गळफास घेण्याआधीही नीरज त्याच्या पत्नीशी बोलला होता.

बायको नांदायला येईना, नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल; घर बंद करून...एकच खळबळ!
up bjp leader son neerajImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 7:31 PM
Share

Husband Wife Relation : पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाने एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पत्नी माहेरी गेल्यानंतर तिला पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नीरज नावाच्या तरुणाने टोकाचे पाऊल उचले आहे. त्याने घरात स्वत:ला बंद करून गळफास घेतला आहे. मृत तरूण हा भाजप नेते सहदेव यांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जातेय. गळफास घेण्याआधी नीरजने आपल्या पत्नीशी संवाद साधला होता. आतापर्यंत मी तुला एक चापटही मारलेली नाही, तरीही तू परत यायला तयार नाहीस, अशी खंत त्याने आपल्या पत्नीसमोर बोलून दाखवली होती, असा दावा नीरजच्या कुटुंबाने केलाय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशातील बागपत कोतवाली परिसरातील देशराज या भागात नीरज आपल्या कुटुंबासह राहत होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्याचा गौरीपूर गावातील तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही काळाने दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. पुढे त्यांचे सतत वाद होऊ लागले.

तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला  पण…

नीरजची पत्नी गर्भवती असून ती काही काळापासून माहेरी राहत होती. पत्नीने पुन्हा सासरी यावे, अशी नीरजची इच्छा होती. त्यासाठी तो तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. दोन दिवसांपूर्वीही याच मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर नीरजला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तशी माहिती नीरजच्या कुटुंबीयांनी दिली.

… तरीदेखील तू परत येत नाहीस

पोलीस ठाण्यात जावे लागले असले तरीही नीरजने पत्नीशी फोनवरून संवाद साधत नाते टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने परत येण्यास नकार दिल्याने तो मानसिकदृष्ट्या खचला होता. गळफास घेण्याआधीही नीरज त्याच्या पत्नीशी बोलला होता. तो परत ये, अशी विनवणी करत होता. मी आतापर्यंत कधीच तुला मारले नाही. एकदाही कानाखाली मारलेली नाही, तरीदेखील तू परत येत नाहीस, अशी खदखद त्याने आपल्या पत्नीला बोलून दाखवली होती, असा दावा नीरजच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सखोल तपास करून पुढील प्रक्रिया केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...