AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका इराणचे सर्वोच्च नेता खामेनेई आणि त्यांच्या मुलाला कसं मारणार? प्लॅन समोर, जगभरात मोठी खळबळ

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वाढल्याचं पहायला मिळत आहे, या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली असून, अमेरिका इराणवर नेमका कसा हल्ला करणार? याची माहिती आता समोर आली आहे.

अमेरिका इराणचे सर्वोच्च नेता खामेनेई आणि त्यांच्या मुलाला कसं मारणार? प्लॅन समोर, जगभरात मोठी खळबळ
trump khameneiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 5:01 PM
Share

इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, अशी स्थिती आहे, अमेरिकेनं मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणात आपलं सैन्यबळ वाढवलं आहे. दोन युद्ध नौका देखील तैनात करण्यात आल्या असून, शेकडो फायटर जेट पाठवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे इराण देखील माघार घेण्यास तयार नाहीये, इराणला रशिया आणि चीनची साथ मिळत असल्यचां दिसून येत आहे, इराणने ओमनाच्या खाडीत रशियासोबत संयुक्त युद्ध सराव सुरू केला आहे. तर इराणवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही रशियाकडून अमेरिकेला देण्यात आला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता अमेरिकेत हालचालींना वेग आला असून, इराणवर कशापद्धतीने सैन्य कारवाई करायची? इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांचा खात्मा कशापद्धतीने करायचा? याचा प्लॅन अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर सादर केला आहे.

जर समजा अयातुल्ला अली खामेनेई यांना जरी मारलं तर त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा मोजतबा हा इराणचा सर्वोच्च नेता बनू शकतो, सर्व सुत्रे त्याच्या हातात जाऊ शकतात, त्यामुळे खामेनेई सोबतच त्यांच्या मुलाचा देखील खात्मा करण्याचा प्लॅन अमेरिकेचा असल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे. एक्सियोसच्या एका रिपोर्टानुसार अमेरिकेच्या सुरक्षा विभागानं इराणवर कशापद्धतीने हल्ला करायचा? याचे वेगवेगळे पर्याय ट्रम्प यांच्यासमोर ठेवले आहेत. मात्र याबाबत अजून तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही, सर्व पर्यायांवर विचार सुरू आहे.

तर दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, खामेनेई यांच्या मुलाची हत्या करण्याचा प्लान यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना सांगण्यात आला होता. मात्र सध्या सर्व उपलब्ध पर्याय आणि त्यानंतर होणारे परिणाम यावर आता अमेरिकेचा संरक्षण विभाग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान सुरुवातीला इराणवर लिमिटेड मिलेट्री हल्ला करायचा, ज्यामधून इराणवर त्यांचा अणु कार्यक्रम रद्द करण्यासाठी दबाव निर्माण करायचा असा देखील अमेरिकेचा एक प्लॅन असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा