Us, Israel, Iran war : ज्याची भीती होती तेच झालं.., शेवटी ट्रम्प यांनी डाव साधलाच…, युद्धात अमेरिकेचा सर्वात मोठा विजय

मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या 22 व्या दिवशी इराणला सर्वात मोठा धक्का बसला असून, इराण बॅकफूटवर गेलं आहे.

Us, Israel, Iran war : ज्याची भीती होती तेच झालं.., शेवटी ट्रम्प यांनी डाव साधलाच..., युद्धात अमेरिकेचा सर्वात मोठा विजय
trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 21, 2026 | 6:45 PM

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 22 वा दिवस आहे. दरम्यान या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणने अणू बॉम्ब तयार करू नये, इराणने आपला अणू ऊर्जा निर्मिती कार्यक्रम बंद करावा यासाठी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. दरम्यान या युद्धामध्ये आता अमेरिका आणि इस्त्रायलला मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. इराणचं प्रमुख अणु ऊर्जा केंद्र असलेल्या नतांज शहरावर शनिवारी इस्त्रायल आणि अमेरिकेनं संयुक्त हल्ला केला आहे. याबाबत इराणची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या मिजान न्यूजकडून माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर अणू ऊर्जा केंद्रामधून मोठ्या प्रमाणात रेडिएशनचं उत्सर्जन होण्याचा धोका होता. मात्र असं कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन झालं नसल्याची माहिती इराणी प्रसार माध्यमांकडून देण्यात आली आहे.नतांज हे इराणमधील मुख्य यूरेनियम संवर्धन केंद्र आहे. या शहराचं अंतर इराणची राजधानी तेहरानपासून जवळपास 200 किलोमीटर इतकं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार युद्ध सुरू झाल्यापासून या शहरावर झालेला हा पहिला हल्ला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या सैन्यांनी संयुक्तपणे हा हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यामुळे जर रेडेएशनचं उत्सर्जन झालं असतं, तर संपूर्ण शहरात हाहाकार उडाला असता, हा हल्ला अतिशय क्रूर पद्धतीचा होता असं म्हणत इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेचा निषेध करण्यात आला आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचंही इराणने म्हटलं आहे. दरम्यान या संदर्भात इराणचे अणू ऊर्जा प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी IAEA ला एक पत्र देखील लिहिलं आहे. या हल्ल्यामुळे आता इराण अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर हल्ले सुरूच असून, या हल्ल्यांमध्ये इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेच्या देखील अनेक सैन्य तळांवर इराणने हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेले आहेत.

Follow Us