AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेसावध इराणचा मोठा घात झाला, डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटी डाव साधलाच, अमेरिकेचं स्पेशल ऑपरेशन, मध्यपूर्वेतून सर्वात मोठी बातमी

मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे अमेरिकेकडून इराणसोबत शांती वार्ताच्या दुसऱ्या फेरीची तयारी सुरू आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेनं समुद्रात मोठा खेळ केला आहे. त्यामुळे आता शांती वार्ता होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

बेसावध इराणचा मोठा घात झाला, डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटी डाव साधलाच, अमेरिकेचं स्पेशल ऑपरेशन, मध्यपूर्वेतून सर्वात मोठी बातमी
US Iran ConflictImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 7:31 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. इराण आणि अमेरिका युद्धावर तोडगा निघणार का? शांती वार्ता यशस्वी होणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. सोमवारी अमेरिकेनं इराणचं एक व्यापारी जहाज आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता, आम्ही याचा बदला घेऊ अशी धमकी देखील इराणने अमेरिकेला दिली होती. दरम्यान त्यानंतर आता मध्य पूर्वेतून मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. यामुळे अमेरिका आणि इराणच्या शांती वार्ताच्या दुसऱ्या फेरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अमेरिकेनं पुन्हा एकदा समुद्रात मोठं कांड केलं आहे, त्यामुळे आता इराणचा संयम सुटल्याचं पहायला मिळत आहे.

अमेरिकेच्या नौदलानं समुद्रात एक हय होल्टेज ऑपरेशन पार पाडलं आहे, हा इराणसाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेनं इराणशी संबंधित असलेल्या आणखी एका तेलाच्या जहाजावर हल्ला केला आहे. हे जहाज अमेरिकेन ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे एकीकडे अमेरिका इराणसोबत युद्धविरामावर वाटाघाटी करण्याचं नाटक करत आहे, तर दुसरीकडे मात्र अमेरिकेकडून इराणच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत, त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये आता पाकिस्तानात शांती वार्ता होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेनं एकही गोळी न चालवता हे ऑपरेशन राबवलं आणि हे तेलाचं जहाज आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर यावर इराणकडून देखील तातडीने प्रतिक्रिया आली आहे. आम्ही शांत बसणार नाही, अमेरिकेला आम्ही उत्तर देऊ असं इराणने म्हटलं आहे. याबाबत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने पोस्ट करत या जहाजाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या कमांडोंनी या जहाजावर अचानक छापा टाकला, त्यांनी जहाजांवरील क्रूला हालचाल करण्याची संधी देखील दिली नाही, त्यानंतर लगेचच त्यांनी हे जहाज आपल्या ताब्यात घेतलं. दरम्यान अमेरिकेच्या या कारवाईमुळे आता शांती वार्ताची शक्यता कमी झाली आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...