ज्याची भीती होती तेच घडणार, आता इराणचा चॅप्टर क्लोज, डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, जग हादरलं

इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मध्य पूर्वेत अमेरिकेनं सौन्यबळ मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे. युद्धनौका देखील तैनात केल्या आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

ज्याची भीती होती तेच घडणार, आता इराणचा चॅप्टर क्लोज, डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, जग हादरलं
trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 23, 2026 | 5:44 PM

अमेरिकेनं या वर्षाच्या सुरुवातीलाच व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. व्हेनेझुएलावर हल्ला करुण अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. व्हेनेझुएलाकडे रशिया आणि चीनने पाठवलेली एअर डिफेंस सिस्टम होती. मात्र अमेरिकन सैन्यांनी या एअर डिफेंस सिस्टमला हुलकावणी देत व्हेनेझुएलावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अमेरिकेकडून अत्याधुनिक सोनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. या शस्त्रांच्या मदतीने अमेरिकेनं अवघ्या काही मिनिटांमध्ये व्हेनेझुएलाचा पराभव करत राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. दरम्यान आता अशी माहिती समोर येत आहे की, व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेनं ज्या सोनिक शस्त्रांचा वापर केला होता, त्याच शस्त्रांचा वापर अमेरिका आता इराणविरोधात देखील करणार आहे.

युरेशियन टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेनं निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यावेळी अत्याधुनिक सोनिक शस्त्राचा वापर केला होता. आता इराणवर हल्ला केल्यास याच शस्त्राचा वापर अमेरिका करणार असल्याचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या स्पेशल मिलेट्री ऑपरेशनची माहिती देताना म्हटलं आहे की, आमच्याकडे असे काही खास गोष्टी आहेत, ज्यामुळेच हल्ल्यावेळी व्हेनेझुएलाची राजधानी काराकास संपूर्णपणे अंधारात बुडून गेली होती, आम्ही हल्ला केला तेव्हा व्हेनेझुएलाचे सैनिक साधा आमचा प्रतिकार देखील करू शकले नाहीत.

दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यानंतर बोलताना निकोलस मादुरो यांच्या एका सुरक्षा रक्षकाने सांगितलं की, अमेरिकेनं या युद्धात खूपच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. त्यांच्याकडे असलेली शस्त्रास्त्र साधी नव्हती, त्यांनी या हल्ल्यात काही तरी लँन्च केलं होतं, त्याचा आवाज एवढा तीव्र होता की आम्ही काहीच करून शकलो नाहीत, आता आमचं डोकं फुटून आमचा मृत्यू होईल असं आम्हाला वाटत होतं, आमच्या नाका, तोंडातून रक्त येत होतं. आम्ही रक्ताच्या उलट्या केल्या, असं या गार्डने म्हटलं आहे. दरम्यान आता अमेरिका याच शस्त्राचा वापर इराणविरोधात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

 

Follow Us