AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची का करायची होती हत्या? 21 वर्षीय ऑस्टीनच्या डोक्यात हादरवून टाकणारा कट!

Donald Trump and Austin Martin : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. शस्त्र असणाऱ्या एका तरूणाने त्यांच्या रिसॉर्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. तो ट्रम्प यांनी का मारू इच्छित होता याची माहिती समोर आली आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची का करायची होती हत्या? 21 वर्षीय ऑस्टीनच्या डोक्यात हादरवून टाकणारा कट!
donald trump and martineImage Credit source: Google
| Updated on: Feb 23, 2026 | 3:57 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेत आहेत. अशातच आता डोनाल्ड ट्रंप यांच्या मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. शस्त्र असणाऱ्या एका तरूणाने फ्लोरिडामधील त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सीक्रेट सर्व्हिसने 21 वर्षीय ऑस्टिन टकर मार्टिन याला ठार केले. ऑस्टिन हा रिसॉर्टच्या नॉर्थ गेटजवळील सुरक्षा परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे एक शॉटगन आणि एक गॅस कॅन होता. तो डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी आला होता अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, ऑस्टिन टकर मार्टिन रिसॉर्टमध्ये प्रवेश करत असताना सीक्रेट सर्व्हिसचे एजंट्सनी त्याला थांबण्याचा आणि शस्त्र खाली ठेवण्यास सांगितले होते. त्याने गॅस कॅन खाली ठेवला, मात्र शॉटगन फायरिंग करण्याच्या उद्देशाने हातात धरली होती. त्यानंतर एजंट्सनी गोळीबार केला, ज्यात तो जागीच ठार झाला. आता ऑस्टिन डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या का करायची होती याचे कारण समोर आले आहे.

डोनाल्ड ट्रंप यांना का मारायचे होते?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्न करणारा ऑस्टिन टकर मार्टिन हा अलीकडे समोर आलेल्या जेफ्री एप्सटीन फाइल्समुळे तो खूप अस्वस्थ होता. त्याने आपल्या सहकाऱ्यांना ‘एप्सटीन फाइल्स वाचा, यातील वाईट गोष्ट खऱ्या आहेत’ असा मेसेजही पाठवला होता. त्याला असे वाटत होते की मोठे लोक सुटून जात आहेत आणि सरकार सत्य लपवत आहे. मात्र प्राथमिक तपासात ऑस्टिन टकर मार्टिन हा कोणत्याही मोठ्या संघटनेशी जोडलेला होता याचे ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे त्याने केवळ रागाच्या भरात हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. आता तपास यंत्रणा पुढील तपास करत आहेत.

ऑस्टिन डोनाल्ड ट्रंप यांचा समर्थक होता?

ऑस्टिन मार्टिन हा डोनाल्ड ट्रंपचा समर्थक असल्याचे बोलले जात आहे. त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी सांगीतले की, तो ट्रंप यांना एक स्ट्राँग नेता मानत होता. तसेच तो धार्मिक देखील होता. असं असलं तरी तो महागाई, नोकरीतील अडचणी आणि तरुणांच्या आर्थिक समस्यांमुळे नाराज होता. तो त्याच्या पालकांसोबत राहत होता आणि अतिरिक्त उत्पन्नासाठी पेन्सिल स्केच काढून विकत असे. तसेच त्याने वेतनवाढीसाठी युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला यश मिळाले नाही अशी माहितीही समोर आली आहे.

Follow Us
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग