AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठा कट, तरुणाचा रिसॉर्टमध्ये घुसून…एजंटेने गोळ्या घालून केले ठार!

अमेरिकेचे विटंर होम म्हणून ओळख असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार ए लागो घरात एका तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केला. या तरुणाला गोळ्या घालून ठार करण्यात आले.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठा कट, तरुणाचा रिसॉर्टमध्ये घुसून...एजंटेने गोळ्या घालून केले ठार!
donald trump mar a lagoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 22, 2026 | 9:55 PM
Share

Donald Trump Mar A Lago :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी घेतलेल्या टॅरिफबाबतचा निर्णय हा असंवैधानिक असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे ट्रम्प चर्चेत असताना एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांचे जिथे घर आहे, त्या भागात घुसण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. या प्रयत्नानंतर अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजन्ट्सने या तरुणाला गोळ्या घालून ठार केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण अमेरिका हादरली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी एका तरुणाने फ्लोरिडा येथील मार ए लागोमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या तरुणाचे वय 20 वर्षे होते. त्याला अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटने गोळ्या घालून ठार केले. हा वीस वर्षीय तरुण सुरक्षारक्षकांचे जाळे तोडून मार ए लागो रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न करत होता. याच भागात डोनाल्ड ट्रम्प यांचे घर आहे. ही घटना घडली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प मार ए लागो या ठिकाणी ट्रम्प नव्हते.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ते विंटर हाऊस

यूएस सिक्रेट सर्व्हिसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार ही घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली. ज्या तरुणाची हत्या झाली, त्याच्याजवळ शॉटगन तसेच एक इंधन सापडलेले आहे. ठार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. मार ए लागो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे विंटर हाऊस म्हणून ओळखले जाते. या घराला खूप कडक सुरक्षा असते.

त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण…

ही घटने समोर येताच अमेरिकेतील स्थानिक पोलिसांनी तसेच एफबीआयने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या भागात नाकेबंदी करण्यात आली. 20 वर्षीय तरुणाने मार ए लागोमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सिक्रेट सर्व्हिस एजंटच्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी सिक्रेट सर्व्हिसचे एजंट आणि तरुणात वाद झाला. त्यानंतर या एजंटने तसेच पाम बीच काऊंटी शेरिफ ऑपिसच्या एका अधिकाऱ्याने मिळून गोळीबार केला. यातच तो 20 वर्षीय तरून ठार झाला. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा