CAA Protest : बुलेटप्रूफ जॅकेट भेदत गोळी आरपार, खिशातील पाकिटामुळे पोलिसाला जीवनदान

फिरोजाबादमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA Protest) निदर्शनादरम्यान कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाला छातीत गोळी लागली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातलं होतं. मात्र, ही गोळी त्या बुलेटप्रूफ जॅकेटला भेदत सरळ आत शिरली.

CAA Protest : बुलेटप्रूफ जॅकेट भेदत गोळी आरपार, खिशातील पाकिटामुळे पोलिसाला जीवनदान
Follow us
| Updated on: Dec 22, 2019 | 1:23 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA Protest) निदर्शनादरम्यान कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाला छातीत गोळी लागली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातलं होतं. मात्र, ही गोळी त्या बुलेटप्रूफ जॅकेटला भेदत सरळ आत शिरली. मात्र, पोलीस अधिकाऱ्याच्या खिशात असलेल्या पाकिटाने त्याचा जीव वाचवला (Police Constable survived Bullet).

सध्या संपूर्ण देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं केली जात आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकही झाली. फिरोजाबादमध्येही अशी परिस्थिती पाहायला मिळाली. इथेही CAA विरोधात जोरदार प्रदर्शनं करण्यात आलं. यावेळी फिरोजाबादमधील पोलीस शिपाई बिजेंद्र कुमार CAA विरोधात होत असलेल्या आंदोलनाच्या ड्युटीवर होते. त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेटही घातलं होतं आणि त्यांनी त्यांचं पाकिट शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलं होतं. प्रदर्शनादरम्यान, पोलीस शिपाई बिजेंद्र कुमार यांना छातीत गोळी लागली. या गोळीचा वेग इतका होता की ती बुलेट प्रूफ जॅकेट भेदून आत शिरली. गोळीमुळे शर्टही फाटला. मात्र, सुदैवाने ती गोळी बिजेंद्र कुमार यांच्या पाकिटात जाऊन फसली आणि त्यांचा जीव वाचला.

माझ्यासाठी हा दुसरा जन्मच आहे : बिजेंद्र कुमार

मी अत्यंत भाग्यवान आहे की गोळी माझ्या पाकिटात फसली, हा माझा पुनर्जन्मच आहे, अशी भावना पोलीस शिपाई बिजेंद्र कुमार यांनी व्यक्त केली.

या आंदोलना दरम्यान अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना गोळ्या लागल्या. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, सध्या स्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिटात चार एटीएम कार्ड

पोलीस शिपाई बिजेंद्र कुमार यांच्या पाकिटात चार एटीएम कार्ड आणि काही देवी-देवतांचे फोटो होते. ही गोळी आंदोलकांकडून चालवण्यात आल्याचं पोलीस शिपाई बिजेंद्र कुमार यांनी सांगितलं. मात्र, ती कुठल्या दिशेने आली याबाबत त्यांना काहीही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Wallet Saved Police Constable

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.