AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नेपाळनंतर आता उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! घरात शिरलेल्या ढिगाऱ्याखाली तिघांचा अंत

Uttarakhand Landslinde: नेपाळच्या पुराचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. उत्तराखंडात जोरदार पावसामुळे आता काही लोकांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! नेपाळनंतर आता उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! घरात शिरलेल्या ढिगाऱ्याखाली तिघांचा अंत
| Updated on: Sep 01, 2026 | 2:24 PM
Share

Uttarakhand Landslide: नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे एकाच वेळी अनेक लोक बेघर झाले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. आता नेपाळचा धोका भारतातही जाणवत आहे. भारतातील उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी अल्मोरा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला. हल्द्वानी ब्लॉकच्या उदयुदा गावात अचानक मोठा चिखलाचा ढिगारा एका घरात घुसला. घरात असलेल्या दोन महिला आणि एक निष्पाप बाळ ढिगाऱ्याखाली पुरले गेले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अपघाताची तीव्रता लक्षात घेता, एसडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलीस दलाला तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. मुसळधार पाऊस आणि कठीण परिस्थिती असूनही, मदत आणि बचाव पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. बचाव पथके मलबा हटवण्यासाठी जेसीबी आणि इतर साधनांचा वापर करत आहेत.

मलबाखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सैनिक सातत्याने बचावकार्य करत आहेत. अपघातानंतर गावात शोककळा पसरली आहे. सोमेश्वरच्या तहसीलदार नेहा धापोला यांनी फोनवरून घटनेची माहिती देताना सांगितले की, उदयुडा गावातील एका निवासी घरावर अचानक भूस्खलन झाले. ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन घरातील दोन महिला आणि एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाला.

सततच्या पावसामुळे अल्मोरासह उत्तराखंडच्या अनेक डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन आणि ढिगाऱ्यांचा धोका वाढला आहे. प्रशासकीय पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पावसाळ्यात संवेदनशील आणि भूस्खलनप्रवण भागांपासून दूर राहण्याचे आवाहनही लोकांना केले जात आहे.

सध्या नेपाळमध्येही बचाव मोहिम सुरु आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारत आणि चीनमधील तज्ज्ञ तांत्रिक पथके नेपाळमध्ये दाखल झाली आहेत. नेपाळी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने भारतातील अकरा आणि चीनमधील नऊ तज्ज्ञ या बचावकार्यात गुंतले आहेत. भारतीय पथक मेलुंग आणि स्याफ्रुबेसी येथील बोगद्यांमधील बचावकार्यात मदत करत आहे, तर चिनी पथक अप्पर त्रिशुली-३ए बोगद्यातील बचावकार्यात मदत करत आहे. दक्षिण कोरियाचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे.

Follow Us
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?