
मागच्या कित्येक वर्षांपासून रामभक्त ज्या दिवसाची वाट पाहात होते. तो क्षण जवळ येतो आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत मोठा सोहळा होतो आहे. या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे.

22 जानेवारीला जरी उद्घाटन होणार असलं तरी या उद्धाटनाआधी राममंदिराची पहिली झलक... फक्त टीव्ही 9 मराठीवर...

उद्घाटनाची तारीख जवळ येते आहे. मात्र या मंदिरात काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. शेवटच्या टप्प्यातील काम सुरु आहे. हजारो कर्मचारी या मंदिराचं काम करत आहेत. महाराष्ट्रातील काही कामगारही इथे पोहोचले आहेत.

कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर आता रामराज्याची कल्पना सत्यात आलं आहे. भव्य दिव्य राममंदिर उभारण्यात आलं आहे. आता अवघ्या देशाला प्रतिक्षा आहे ती राम मंदिराच्या उद्घाटनाची...

राम मंदिरात एकूण सहा मंदिर असणार आहेत.एकदा तुम्ही मंदिरात आला की, प्रभू रामांसोबतच तुम्हाला सिता, हनुमान यांचंही दर्शन मिळणार आहे. आता अवघ्या रामभक्तांना ओढ लागली आहे ती मंदिराच्या उद्घाटनाची...