'रॉकस्टार झिवा', धोनीची मुलगी झिवाचा गिटार वाजवत गाणं गाताना व्हिडीओ व्हायरल

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसा तर सोशल मीडियावर फार अॅक्टिव नसतो. मात्र, त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा धोनी त्याची मुलगी झिवासोबतचा फोटो किंवा व्हिडीओ आठवणीने आपल्या फॅन्ससोबत शेअर करतो.

Ziva Dhoni singing song, ‘रॉकस्टार झिवा’, धोनीची मुलगी झिवाचा गिटार वाजवत गाणं गाताना व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसा तर सोशल मीडियावर फार अॅक्टिव नसतो. मात्र, त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा धोनी त्याची मुलगी झिवासोबतचा फोटो किंवा व्हिडीओ आठवणीने आपल्या फॅन्ससोबत शेअर करतो. धोनी सध्या मैदानापासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत मसूरी येथे सुट्टीसाठी गेला आहे. या ठिकाणचाच त्याचा मुलगी झिवासोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे (Ziva Dhoni singing song).

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये धोनीची मुलगी झिवा एखाद्या रॉकस्टारसारखी गाणं म्हणताना दिसत आहे. 4 वर्षांची झिवा गिटार वाजवून खूप निरागसपणे गाणं म्हणत आहे. या व्हिडीओत झिवा ‘लँड ऑफ हारमनी’ हे इंग्लिश गाणं म्हणत आहे. धोनीने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. त्याने या व्हिडीओसोबत म्हटलं, ‘बर्फ जीवामधील शानदार टॅलेंटला बाहेर आणत आहे’.

 

View this post on Instagram

 

Snow brings the best out of her @ziva_singh_dhoni

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

धोनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये झिवा अगदी लहानग्या वयातही गाणं म्हणताना गिटारही वाजवत आहे. यात ती अगदी गाण्याच्या तालानुसार गिटारवर हात फिरवत आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत या व्हिडीओला 22 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

याआधी धोनीची पत्नी साक्षीने देखील धोनी आणि झिवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत धोनी आणि झिवा दोघेही बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे. झिवासोबत एक कुत्राही दिसत आहे. झिवाने धोनीसोबत मिळून तेथील बर्फापासून एक स्नो मॅन बनवल्याचं दिसत आहे. या स्नो मॅनकडे कुतुहलाने पाहत जीवा शेजारी उभ्या असणऱ्या कुत्र्यांच्या पाठिवर प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Holiday mode ! ❄️

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने मागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काहीसा ब्रेक घेतला आहे. धोनीने मागील वर्षी 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळला होता. यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *