AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Election 2027 : सोबत या युती करू, ओवैसी यांची काँग्रेस, सपाला खुली ऑफर; उत्तर प्रदेशात घडामोडी वाढल्या, भाजपाचं टेन्शन वाढणार?

असदुद्दीन ओवैसी यांनी सध्या विरोधी बाकावर असलेल्या पक्षांना उत्तर प्रदेशात युती करण्याची ऑफर दिली आहे. जे कोणी भाजपाला पुन्हा एकदा सत्तेत येण्यापासून रोखू इच्छित असेल त्यांनी एमआयएमला पाठिंबा दिला पाहिजे, असं ते म्हणालेत.

UP Election 2027 : सोबत या युती करू, ओवैसी यांची काँग्रेस, सपाला खुली ऑफर; उत्तर प्रदेशात घडामोडी वाढल्या, भाजपाचं टेन्शन वाढणार?
asaduddin owaisi and up electionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 9:17 PM
Share

UP Vidhan Sabha Election 2027 : उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. या राज्यात पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 साली विधानसभेची निवडणूक होणार आहे. हीच बाब लक्षात घेता तेथे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एमआयएम या पक्षाचेही उत्तर प्रदेशमध्ये मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे या पक्षानेही आपली कंबर कसली आहे. दरम्यान, आता याच पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधकांना आघाडीची मोठी ऑफर दिली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

ओवैसी यांनी नेमकी काय ऑफर दिली?

असदुद्दीन ओवैसी यांनी सध्या विरोधी बाकावर असलेल्या पक्षांना उत्तर प्रदेशात युती करण्याची ऑफर दिली आहे. जे कोणी भाजपाला पुन्हा एकदा सत्तेत येण्यापासून रोखू इच्छित असेल त्यांनी एमआयएमला पाठिंबा दिला पाहिजे. आम्ही येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत आघाडी करण्याबाबत निर्णय घेणार आहोत, असे ओवैसी म्हणाले आहेत. आता ओवैसी यांच्या या ऑफरमुळे विरोधकांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या काँग्रेस, समाजवादी पार्टी हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत या दोन्ही पक्षांनी एमआयएमसोबत युती केली तर राजकीय फायदा होऊ शकतो. परंतु युती प्रत्यक्षात न उतरल्यास मुस्लीम मतं फुटण्याची शक्यता आहे.

ओवैसींची ऑफर, आता नेमकं काय होणार?

दरम्यान, ओवैसी यांनी आघाडी करण्याची ऑफर दिलेली असली तरीही काँग्रेस आणि समाजवादी पार्टीपुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. याबाबत काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी प्रतिक्रिया दिलीय. भाजपाला पराभूत करणे हेच विरोधकांचे प्रमुख लक्ष्य असायला हवे. फक्त मुस्लीम मतांच्या आधारे भाजपाला पराभूत करता येणार नाही, हे एमआयएमने लक्षात घेतले पाहिजे. ओवैसी यांनी चार किंवा पाच जागांवर जरी विजय मिळवला तरी त्यातून काहीही साध्य होणारर नाही. एमआयएममुळे मतफुटी झाली तर त्याचा थेट फायदा भाजपाला होईल. हैदराबाद आणि उत्तर प्रदेशचे राजकारण वेगळे आहे, हे ओवैसी यांनी समजून घेतले पाहिजे, असे मत मसूद यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता काँग्रेस ओवैसी यांची ऑफर स्वीकारणार का? ऑफर स्वीकारली तर जागावाटपाचा फॉर्म्यूला काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...