AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी मुलगा देत का मुलगा? असं एक गाव जिथे शेकडो मुली अविवाहित, लग्नासाठी एका पायावर तयार, पण ही अट ऐकलीये का?

भारतामध्ये लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे. देशभरात दिवसेंदिवस अविवाहित मुलांची संख्या वाढतच चालली आहे. परंतु एक गाव असं आहे, तिथं मात्र उलटं चित्र पहायला मिळत आहे. या गावात शेकडो मुली अविवाहित आहेत.

कोणी मुलगा देत का मुलगा? असं एक गाव जिथे शेकडो मुली अविवाहित, लग्नासाठी एका पायावर तयार, पण ही अट ऐकलीये का?
या गावात लग्नासाठी मुलगाच मिळत नाही Image Credit source: Getty Images
| Updated on: Oct 01, 2026 | 8:47 PM
Share

भारतामध्ये लग्नाचा प्रश्न हा सध्या खूप गंभीर बनला आहे. मुलांचं लग्नाचं वय झालंय पण लग्नाला मुलगी मिळत नाहीये, अशी पालकांची तक्रार असते. अनेक मुलांचं तर लग्नाचं वय उलटून गेलं परंतु अजूनही त्यांचं लग्नच झालेलं नाहीये. लग्न उशिरा होण्याचं किंवा लग्नासाठी मुलगी न मिळण्याची अनेक कारणं आहेत, त्यामधील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आज मुली देखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मुलींनी मुलांच्या तुलनेमध्ये शिक्षणामध्ये देखील आघाडी घेतली आहे. चांगली नोकरी आणि मिळणारा गलेलठ्ठ पगार यामुळे साहाजिकच मुलांकडून मुलीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातील अनेक मुलं या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे अनेक मुलांना आज लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज लग्नापेक्षा करिअरला अधिक महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे करिअरमध्ये सेट होण्याच्या नादात अनेक मुलांचं वय उलटून जातं. त्यामुळे अशा मुलांची लग्न होऊ शकत नाहीत.

शहरी भागात तर ही समस्या आहेच परंतु ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्रतेनं भेडसावत आहे. आज प्रत्येक गावात सरासरी साठ ते सत्तर मुलं अशी आहेत, ज्यांची लग्नच झालेली नाहीयेत. काही मुलांनी तर आता आपलं लग्न होऊ शकतं ही अशाच सोडून दिली आहे. कारण मुलींचा शहरी भागत राहण्याचा कल वाढला आहे. ग्रामीण भागातली जरी मुलगी असेल तरी देखील तिला विवाहासाठी शहरात राहणारा आणि नोकरी करणाराच मुलगाच हवा आहे. त्यातच शेतीचं उत्पन्न आता पूर्वीसारखं शाश्वत राहिलं नसल्याने मुलींचे पालक देखील शेतकरी कुटुंबात आपली मुलगी देण्यासाठी फारसे इच्छूक नाहीयेत. त्यामुळे विवाहाचा प्रश्न फार गंभीर बनला आहे.

परंतु जगाच्या पाठीवर असं देखील एक गाव आहे, जिथे तब्बल 600 मुली या अविवाहित आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, परंतु ही गोष्ट खरी आहे. या गावाचं नाव आहे नोवादोकॉर्डिओ हे गाव ब्राझिलमध्ये आहे. या गावात तब्बल 600 मुली अविवाहित आहेत. त्या लग्नासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांचं लग्न होत नाही, त्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत, एक म्हणजे इथे जे पुरुष आहेत, त्यातील बहुतेक सर्व विवाहित आहेत. तसेच ज्यांचा विवाह झालेला नाहीये, ते या मुलींचे नातेवाईक आहेत, त्यामुळे ते यांच्याशी विवाह करू शकत नाहीत. दुसरं प्रमुख कारणं म्हणजे या मुलींची अट अशी आहे, की लग्न केल्यानंतर मुलाने त्याच गावात राहायचं, या मुली गाव सोडण्यास तयार नाहीये. हे गाव प्रचंड श्रीमंत आहे, या मुली आपल्या पतीचा सर्व खर्च करण्यास देखील तयार आहे, त्याला लग्ननंतर कोणतंही काम करण्याची गरज नाहीये, परंतु अट फक्त एकच लग्नानंतर याच गावात राहायचं, याच अटीमुळे या तरुणींना लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना