असं एक गाव जिथे जगभरातून महिला फक्त शरीर सुखासाठीच येतात, नेमकं कारण काय?
अनेक देश, राज्य, गावं कोणत्या न कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध असतात. तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, की जगाच्या पाठिवर असं देखील एक बेट आहे, जिथे महिला फक्त शरीरसुखासाठीच येतात.

जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, की ज्यांची विशिष्ट ओळख आहे. या देशांमध्ये पर्यटक नेहमीच गर्दी करत असतात. अनेक देशांची तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. अशा देशातील सरकार आपल्या देशात आलेल्या पर्यटकांना आकर्षक सोई -सुविधा उपलब्ध करून देतात. आपल्या देशामध्ये आलेल्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याकडे या देशांमधील सरकारचं विशेष लक्ष असतं. अनेक देश तेथील विशिष्ट संस्कृती. पर्यटनस्थळं यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच अशा देशातील काही विशिष्ट गावं देखील कोणत्या न कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध असतात. जसं की भारतामधील मध्य प्रदेशात देखील एक असा जिल्हा आहे, जिथे ‘धडी’च्या प्रथेचं पालन केलं जातं. ही एक अशी प्रथा आहे की, इथे लग्नासाठी तरुणी भाड्याने मिळतात. शिवपुरी जिल्ह्यात दरवर्षी असा बाजार भरला जातो. एका रिपोर्टनुसार एक विशिष्ट करार पद्धतीचं हे लग्न असतं. जो करार 15 हजार रुपयांपासून ते चार लाखरुपयांपर्यंत केला जातो.
असंच एक गाव लडाखमध्ये देखील आहे, ज्याला आर्य व्हॅली असं म्हटलं जातं. या गावात विदेशी महिला फक्त गर्भधारणेसाठीच येतात. या गावात ब्रोकापा समाजाचे लोक राहतात. हे लोक स्वत:ला अलेक्झांडर द ग्रेटच्या सैनिकांचे वंशज मानतात. त्यामुळे आपल्याही पोटी अशाच वंशाची मुलं जन्माला यावीत या इच्छेतून या महिला गर्भधारणेसाठी इथे येतात. येथील स्थानिक लोकांशी त्या शरीरसंबंध ठेवतात. त्या बदल्यात या महिला त्यांना पैसे तसेच महागड्या भेटवस्तू देखील देतात. भारतामध्ये जशी ही काही गाव आहेत, तसेच जगाच्या पाठीवर देखील काही बेटं, गावं आहेत, जिथे आजही काही विचित्र प्रथा परंपरेचं पालन केलं जातं.
असंच एक बेट आहे, ग्लॅम्बिया नावाचं हे बेट आफ्रिका खंडात आहे. या बेटाचं वैशिष्ट म्हणजे येथे दरवर्षी युरोपीयन देशांमधून हजारो महिला फक्त शरीर सुखासाठीच येतात. यामध्ये 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या स्त्रीयांची संख्या जास्त असते. या महिला येथील स्थानिक तरुणांशी शरीरसंबंध ठेवतात. त्याबदल्यात त्यांना त्या पैसे देतात, महागडे गिफ्ट देखील देतात. परंतु अलिकडाच्या काळात अशा महिलांची संख्या इतकी वाढली आहे, की याची गंभीर दखल आता तेथील प्रशासनाने घेतली आहे. ग्लॅम्बियांच्या सरकारने आता थेट एक पत्रच ब्रिटिश सरकारला दिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी थेट असं म्हटलं आहे की आम्हाला शरीर सुखासाठी आलेल्या महिला नकोत, तर आम्हाला पर्यटकांची गरज आहे, पर्यटक हवे आहेत. हे बेट फार मोठं नाही तो अनेक गावांचा मिळून बनलेला एक समुह आहे.
