AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमल इलायचीच्या जाहिरातीवरून वाद; PB Agroची थेट दिल्ली हायकोर्टात धाव, नेमकं काय घडलं ?

विमल इलायची निर्मिती करणाऱ्या पीबी ॲग्रो कंपनीने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना बजावलेल्या नोटिसीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

विमल इलायचीच्या जाहिरातीवरून वाद; PB Agroची थेट दिल्ली हायकोर्टात धाव, नेमकं काय घडलं ?
Vimal Elaichi moves to Delhi High Court
| Updated on: Sep 07, 2026 | 5:18 PM
Share

विमल इलायचीची निर्मिती करणाऱ्या पीबी ॲग्रो कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता पीबी ॲग्रो कंपनीने न्यायालयात जात याच नोटिसींनाआव्हान दिलं आहे. विमल इलायचीच्या जाहिरातींच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष किंवा सरोगेट जाहिरात केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र FDA ने केला होता. मात्र, कंपनीने हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. एफडीएने जारी केलेल्या नोटीस रद्द करण्यासाठी कंपनीने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांनी महत्त्वाच्या प्राथमिक मुद्द्यावर निर्णय राखून ठेवला आहे.

FDA ने शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफकडे काय केली मागणी ?

रिपोर्ट्सनुसार, विमल इलायची आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पान मसाला ही दोन स्वतंत्र उत्पादनं आहेत, हे सिद्ध करणारी कागदपत्रं सादर करा, असं महाराष्ट्र FDA ने विमल इलायचीच्या जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना सांगितलं होतं. याशिवाय, संबंधित जाहिरात मोहीम तात्काळ थांबवावी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेलं संबंधित प्रचारात्मक साहित्य हटवावं, अशी मागणीही FDA ने केली होती.

महाराष्ट्र FDA ने 11 ऑगस्ट 2026 रोजी  नोटिस जारी केली, त्याविरोधात पीबी ॲग्रोने आता दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  या प्रकरणातील पुढील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाला या याचिकेवर सुनावणी करण्याचा अधिकार आहे की नाही, या प्राथमिक प्रश्नावर अवलंबून आहे.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्र FDAने विमल इलायचीच्या जाहिरातीची गंभीर दखल घेत तिच्या स्वरूपाबाबत चौकशी सुरू केली. ‘विमल’ हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडला जात असल्याने, त्याच नावाने करण्यात येणाऱ्या इलायचीच्या जाहिरातीमुळे ग्राहकांना पान मसाल्याच्या ब्रँडची आठवण येऊ शकते, असा युक्तिवाद FDAने केला होता. त्यामुळे ही जाहिरात सरोगेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात ठरते का, याची चौकशी FDAकडून सुरू करण्यात आली.

Follow Us
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी