भारत जोडो यात्रेतील पोस्टरमुळे काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत…

| Updated on: Sep 21, 2022 | 7:53 PM

ज्यावेळी भारत जोडो यात्रेच्या पोस्टरवर सावरकरांचे छायाचित्र असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी सावरकरांच्या जागी बापूंचा फोटो लावला.

भारत जोडो यात्रेतील पोस्टरमुळे काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत...
Follow us on

नवी दिल्लीः सध्या काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) जोरदारपणे सुरू आहे. भारत जोडो यात्रा ही केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात पोहोचताच काँग्रेसकडून (Congress) एक चूक झाली आहे. भारत जोडोच्या पोस्टरमध्ये विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचा फोटो इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या रांगेत लावला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडूनच स्पष्टीकरण देऊन ही प्रिटींग मिस्टेक असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसने सावरकरांना कधीही स्वातंत्र्यसैनिक मानले गेले नाही. इंग्रजांबरोबर लढण्याऐवजी त्यांनी फक्त त्यांची माफी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केरळचे अपक्ष आमदार पी. व्ही अन्वर यांना एलडीएफचा पाठिंबा आहे. तर या प्रकरणावरुन सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी सांगितले आहे की, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून चेंगमनाड येथे लावण्यात आलेल्या फलकांमध्ये सावरकरांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

ज्यावेळी भारत जोडो यात्रेच्या पोस्टरवर सावरकरांचे छायाचित्र असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या जागी बापूंचा फोटो लावला.

त्यावेळी मुस्लिम लीगने हे पोस्टर कर्नाटकातील असल्याचे सांगितले. जिथे भाजपने स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पोस्टर लावले होते, परंतु पोस्टर केरळचेच होते हे काही वेळानंतर स्पष्टही झाले आहे. महात्मा गांधींच्या फोटो लावून आता सावरकरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या पोस्टरवर सावरकरांचा फोटो असल्यामुळे भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले की, “वीर सावरकरांचे फोटो एर्नाकुलम (विमानतळाच्या जवळ) काँग्रेसच्या भारत जोडी यात्रेला शोभून दिसतात असंही म्हटले आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 150 दिवस चालणार असून 3,570 किमीचा प्रवास करणार असल्याचे सांगण्यात आले. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ही यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ही यात्रा आता जम्मू-काश्मीरपर्यंत जाणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.