AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधारात दडलेलं रहस्य.. ‘ती’ कोण? गाव, गूढ अन् थरारक प्रसंग; महाराष्ट्रातल्या ‘सालबर्डी’ गावातली अंगावर काटा आणणारी कथा

गाव, गूढ आणि रहस्याने व्यापलेली कथा.. अनपेक्षित वळणं, थरारक प्रसंग आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा.. ‘सालबर्डी’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अंधारात दडलेलं रहस्य.. 'ती' कोण? गाव, गूढ अन् थरारक प्रसंग; महाराष्ट्रातल्या 'सालबर्डी' गावातली अंगावर काटा आणणारी कथा
सालबर्डीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2026 | 9:23 PM
Share

अंधाराच्या गर्भात लपलेली एक अनोळखी कहाणी.. जिचं सत्य आजवर कुणालाच कळलेलं नाही. ‘सालबर्डी’ या शांत, निरागस वाटणाऱ्या गावात अचानक घडू लागलेल्या गूढ घटनांनी भीतीचं सावट पसरवलं आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. आणि वातावरणात दडलेला अनामिक थरार! या सगळ्याच्या मध्यभागी आहे एक रहस्यमय ‘ती’.. जी अचानक गावात येते आणि घटनांचा वेगच बदलून टाकते. ती नेमकी कोण? तिचा या घटनांशी काय संबंध? ती सत्य शोधायला आली आहे की स्वतःच एखादं गूढ घेऊन? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि चित्रपटप्रेमींमध्ये याच प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. मराठीतील एका ग्लॅमरस अभिनेत्रीचं नाव या भूमिकेसाठी चर्चेत असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली असली तरी तिची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचली आहे.

इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पाहणं अतिशय थरारक असणार आहे. भीती, थरार, विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात मराठीतल्या उत्तम कलाकारांची मांदियाळी आहे. परंतु हे कलाकार नेमके कोण आहेत, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘सालबर्डी’ चित्रपटाचं छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचं आहे. तर पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचं आहेत. गुरु ठाकूर, मुकुंद भालेराव यांनी लिहिलेल्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचं संगीत लाभलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटाला लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, आशीष पाटील यांनी केलं आहे. कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील आहेत. वेशभूषा प्रणिता चिंदगे तर रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांची आहे. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचं आहे.

Follow Us
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका.
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे....
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे.....
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?.
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.