AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 टक्के भारत अमेरिकेवर… डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, चीन, पाकिस्तानला दणका..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या तूफान चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला मोठा धक्का दिला. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भाष्य करत थेट मोठा दावा केला. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे.

100 टक्के भारत अमेरिकेवर... डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, चीन, पाकिस्तानला दणका..
Donald Trump
| Updated on: May 25, 2026 | 8:11 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराण आणि अमेरिका युद्धात व्यस्त आहेत. यादरम्यानच त्यांनी भारताबद्दल अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे जोरदार काैतुक केले. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मला खूप जास्त आवडतात. मोदी माझे खूप चांगले मित्र असून भारत 100 टक्के विश्वास आमच्यावर करू शकतो. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेचे नवे राजदूत सेर्जियो गोर उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी मोठे सरप्राईज देत थेट डोनाल्ड ट्रम्प यांना लाईव्ह कॉल केला. दिल्लीमध्ये बसलेले सर्वजण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलत होते. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भाष्य केले. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, मला नरेंद्र मोदी खूप जास्त आवडतात. मोदी माझे चांगले मित्र आहेत. ते खूप जास्त चांगले आहेत.

हेच नाही तर यादरम्यान मोठा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, यापूर्वी कधीच भारत आणि अमेरिकेचे इतके चांगले संबंध नव्हते, जेवढे आता आहेत. यादरम्यान भारताला विश्वास दाखवत त्यांनी म्हटले की, भारताला कधीही काहीही मदतीची गरज लागली तर त्यांना माहिती आहे की,कोण त्यांच्यासोबत आहे, त्याचे उत्तर अमेरिका आहे. त्यांनी पुढे म्हटले की, भारत अमेरिकेवर 100 टक्के विश्वास करू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र असल्याचे सांगताना दिसतात. भारत आणि अमेरिकेच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढउतार आल्याचे बघायला मिळाले. भारतावर मोठा टॅरिफही अमेरिकेने लावला. इराण आणि अमेरिका युद्धात भारत शांततेच्या मार्गाने आहे. युद्धात भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल केलेल्या विधानाने चीनसह पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे.

डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपूर्वीच चीन दाैऱ्यावर होते. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. भारतातही महागाईत वाढ झाली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशात ऊर्जेचे संकट आहे. इराणसोबतच्या युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या छोट्या मुलाच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला. यासोबतच अमेरिकेला लवकरात लवकर इराणसोबत करार करायची आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ