AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दणका, एकीकडे चर्चेचे नाटक तर दुसरीकडे भयंकर प्लॅन, जगात हाहाकार..

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवे महत्वाचे आहे. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच आता एक धक्कादायक माहिती पुढे आली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दणका, एकीकडे चर्चेचे नाटक तर दुसरीकडे भयंकर प्लॅन, जगात हाहाकार..
Donald Trump
| Updated on: May 23, 2026 | 8:47 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच अमेरिकेकडून युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे युद्ध काही थांबत नाहीये. अमेरिका जगाला आम्ही युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न करत असल्याचे दाखवत आहे. पण दुसरीकडे त्यांचा मोठा काहीतरी प्लॅन असल्याचे दिसतंय. नुकताच आलेल्या माहितीने एकच खळबळ उडाली. इराणसोबतच युद्ध थांबवण्यापूर्वी अमेरिकेला काहीतरी भयंकर करायचे आहे. इराणवर पुन्हा मोठी लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेकडून केली जात आहे. पाकिस्तानचे फील्ड मार्शल असिम मुनीर तेहरानमध्ये दाखल झाले. ॲक्सिऑसच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सकाळी इराण युद्धासंदर्भात आपल्या राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत एक मोठी बैठक घेतली, ज्यात नवीन हल्ल्यापासून ते अयशस्वी वाटाघाटींपर्यंतच्या प्रत्येक पर्यायावर चर्चा झाली.

इस्त्रायलचा इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याकरिता अमेरिकेवर दबाव आहे. मात्र, आता अमेरिकेला हल्ला नको आहे. वाटाघाटीतून मार्ग काढण्याकरिता चर्चा केली जात आहे, असे जगाला दाखवले जातंय. मात्र, दुसरीकडे इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत अमेरिका असल्याचे रिपोर्टमधून पुढे येत आहे. इराणने देखील स्पष्ट केले की, आम्ही प्रत्येक स्थितीकरिता तयार आहोत.

वृत्तांनुसार, डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. ज्यापद्धतीने इराणसोबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यामधून मार्ग अजिबात निघू शकत नाही. यापूर्वी स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम करार करा नाही तर आम्ही तुमच्यावर मोठे हल्ले करू अशा धमक्या दिल्या. मात्र, त्यांच्या या धमक्यांना कोणत्याही प्रकारची दाद इराणने दिली नाही. काही मुद्द्यांमध्ये दोन्ही देशात एकविचार होऊ शकत नाहीये.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सांगितले की, चर्चेला आणखी एक संधी दिली पाहिजे, परंतु गुरुवार रात्रीपर्यंत त्यांची भूमिका हल्ल्याकडे वळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निर्णायक मोठ्या लष्करी कारवाईची शक्यताही वर्तवली आहे, ज्यानंतर ते विजय घोषित करून युद्ध संपवू शकतात, असे सांगितले जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ