AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तिथे गेलो तर मला ठार केले जाईल… डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड भीती, थेट म्हटले, मी जर..

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे लग्न आहे. मात्र, यादरम्याचन त्यांनी इराणसोबतच्या युद्धाबाबत भाष्य केले.

मी तिथे गेलो तर मला ठार केले जाईल... डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड भीती, थेट म्हटले, मी जर..
US President Donald Trump
| Updated on: May 22, 2026 | 11:06 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदर इस्त्रायलसोबत मिळून इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी हे युद्ध फार काळ चालणार नसल्याचे थेट संकेत दिले. मात्र, आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही युद्ध काही थांबत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना लवकरात लवकर हे युद्ध संपवायचे आहे. मोठे नुकसान अमेरिकेचे होत आहे. शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीही गगणाला पोहोचल्या आहेत. पुरवठा साखळीच विस्कळीत झाली. युद्धविरामाबाबत अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहे. सतत बैठका आहेत. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांना आता आपल्या जीवाचीही भीती वाटताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे लग्न आहे. मुलाच्या लग्नाला त्यांना उपस्थित राहायचे आहे. पण जर लग्नाला गेले तर ते मारले जातील, याचीही भीती त्यांच्या मनात आहे.

मुलाच्या लग्नाला जायचे आहे पण सध्याचा काळ आव्हानात्मक असल्याने आपण तिथे जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मजाकमध्ये म्हटले की, मी गेलो तर मला मारले जाईल आणि नाही गेलो तरीही मला मारले जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानानंतर मुद्दा हा उपस्थित होतो की, इराणच्या भीतीने ते आपल्याच देशात फिरणे टाळत आहेत का? त्यांना इराणकडून मारले जाण्याची भीती वाटतंय का?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे या आठवड्यातच लग्न आहे. बहामासमध्ये बेटिना अँडरसनशी विवाह करणार आहे. हा एक छोटा खासगी समारंभ आहे. डोनाल्ड ट्रम्प यादरम्यान बोलताना म्हणाले की, माझ्या मुलाची इच्छा आहे की, मी त्याच्या लग्नात उपस्थित राहावे. पण सध्याची परिस्थिती सोपी नाही. हा एक छोटासा समारंभ आहे. मी तिथे जाण्याचा प्रयत्न करेल.

पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी हसत हसत म्हटले की, मी त्याला म्हणालो की, माझ्याकरिता ही योग्य वेळ नाही. मी सध्या एका गोष्टीच अडकलो आहे, इराणमध्ये. इराणसोबतच आणखीन काही गोष्टीमध्ये गुंतलो आहे. यामध्ये माझा कोणताही विजय होणार नसल्याचेही सांगताना यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प दिसले. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, लग्नाला गेलो तरीही माझ्यावर प्रचंड टीका होईल.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार