AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत हाहाकार! इराण युद्धात मोठा दणका, अमेरिकेच्या लष्करातील तब्बल 42..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हे युद्ध अजूनही संपले नाही. यादरम्यान आता अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. या युद्धादरम्यान झोप उडवणारी माहिती पुढे आली. अमेरिकेला या युद्धात मोठा फटका बसला आहे.

अमेरिकेत हाहाकार! इराण युद्धात मोठा दणका, अमेरिकेच्या लष्करातील तब्बल 42..
Donald Trump
| Updated on: May 22, 2026 | 8:41 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या माहितीने एकच मोठी खळबळ उडाली. या युद्धात फक्त इराणचीच वाट लागली नाही तर थेट अमेरिकेलाही मोठा दणका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेस रिसर्च सर्व्हिसच्या एका नुकताच आलेल्या अहवालानुसार, इराणसोबतच्या युद्धात 40 दिवसांमध्ये अमेरिकन सैन्याचे मोठे नुकसान झाले. या 40 दिवसात अमेरिकेच्या लष्करातील तब्बल 42 लष्करी विमाने नष्ट झाली. त्याने अत्यंत मोठे नुकसान झाले. धक्कादायक म्हणजे यात अमेरिकेच्या लष्करातील बेस्ट विमानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या एफ-35 स्टेस्थ फायटरचाही समावेश आहे. लष्करी कारवाईदरम्यान अमेरिकेच्या विमानांना इराणकडून टार्गेट करण्यात आले. थेट मोठे हल्ले केले. इराणच्या हल्ल्यात अनेक अमेरिकी विमान पडले. हेच नाही तर सतत अमेरिकी विमान पडत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा संतापही व्यक्त करण्यात आला होता.

या अहवालादरम्यान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त करून विमाने युद्धाच्या शेवटच्या दिवसांमध्ये पडली. इराण युद्धात अमेरिकेने लष्करी कारवाई रोखली आहे. युद्धविराम चर्चेवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, अजून काही निर्णय होऊ शकला नाही. अमेरिकेने पुन्हा एकदा लष्करी कारवाई करण्याची मोठी धमकी इराणला दिली. मात्र, यात फक्त इराणच नाही तर अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले.

दुसरीकडे इराणवर लष्करी कारवाई करण्याकरिता इस्त्रायल आग्रही आहे. इराणच्या मुलभूत सुविधांचे नुकसान अधिकाअधिक व्हावे, ही इस्त्रायलची मागणी आहे. मात्र, आता अमेरिकेला इराणवर शक्यतो कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई न करता, चर्चेतून मार्ग काढायचा आहे. यावरून अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये मतभेदही झाले. कारण लष्करी कारवाईत थेट अमेरिकेचेही नुकसान होत आहे.

मंगळवारी इराणवर अमेरिका हल्ला करणार असल्याचे सांगितले जात होते. तशी तयारीही करण्यात आली. मात्र, ऐनवेळी अमेरिकेने लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. अहवालातून असे दिसून येते की, अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षादरम्यान इराणने आपल्या मर्यादित हवाई संरक्षण साधनांचा उत्कृष्ट वापर केला. इराणने अमेरिकेच्या एफ-35 आणि इतर लढाऊ विमानांना खास पद्धतीने टार्गेट केले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ