मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, ‘एकवेळ समझोता’अंतर्गत इतके शेतकरी पात्र
फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या एकवेळ समझोता योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील 1 लाख 69 हजार 820 शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील स्वतःच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकवेळ समझोता अंतर्गत पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकवेळ समझोता अंतर्गत पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. दोन लाखांवरील कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर दोन लाखांची ही कर्जमाफी मिळणार आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामीण बँकांमध्ये ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
