AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, इच्छा नसूनही इराणविरोधातील युद्ध थांबवावं लागणार?

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. नुकतीचं डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा हल्ल्याची धमकी दिली होती, त्या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, इच्छा नसूनही इराणविरोधातील युद्ध थांबवावं लागणार?
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 8:57 PM
Share

28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर पहिला हल्ला झाला आणि जगात एका भीषण अशा युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतील. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मात्र इराणने देखील आपल्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यानं अमेरिका आणि इस्त्रायलच्या नाकेनऊ आणले, शेवटी 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष कायम आहे. इराणने अण्वस्त्र करार करावा आणि त्यांनी अण्वस्त्र तयार करू नयेत यासाठी इराणवर अमेरिकेकडून वारंवार दबाब आणण्यात येत आहे. नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा इराणला धमकी देण्यात आली आहे, जर इराणने लवकरात लवकर करार केला नाही तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा हल्ला करू, आमच्याकडे सैन्य तयार आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची सैन्य शक्ती मर्यादित करण्याचा प्रस्ताव पास झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या रिपब्लिकनच्या 4 खासदारांनी देखील ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रेट्स पक्षाची साथ दिली आहे. तीन खासदार मतदानाच्या वेळी उपस्थित नव्हते, तर एका खासदाराने ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केलं आहे.

50-47 मतांनी हा प्रस्ताव पास झाला आहे, हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र अजूनही या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी काही प्रकिया आहेत, ज्या पार केल्यानंतरच या प्रस्तावाचं कायद्यात रुपातंर होणार आहे. जर या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर झालं तर त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना इराणसोबत युद्ध सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसची परवानगी घ्यावी लागणार आहे. काँग्रेसकडून परवानगी मिळणं हे वाटतं तितकं नक्कीच सोपं नसणार आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना इच्छा नसून देखील इराणविरोधातील युद्ध थांबावं लागण्याची शक्यता आहे. सीनेटमध्ये या प्रस्तावावर अजून फायनल मतदान बाकी आहे, समजा जरी हा प्रस्ताव मंजूर झालाच आणि त्याविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी वीटोचा अधिकार वापरला तर मात्र विरोधी पक्षाच्या अडचणी वाढू शकतात. कारण वीटो रद्द करण्यासाठी दोन तृतिआंश मतदानाची गरज असणार आहे, जे की सध्या जवळपास अशक्य मानलं जातं आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला