AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर महायुतीत ठरलं, शिंदे सेना बॅकफुटवर? किती जागा मिळणार? फॉर्म्युला आला समोर

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं असून, या निवडणुकीसाठी २५ मे ते १ जून अर्ज भरण्याची मुदत असून, २२ जून रोजी मतदान होईल. अनेक चर्चांनंतर अंतिम फॉर्म्युला ठरल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. कोणाच्या वाट्याला किती जागा ?

अखेर महायुतीत ठरलं, शिंदे सेना बॅकफुटवर? किती जागा मिळणार? फॉर्म्युला आला समोर
| Updated on: May 25, 2026 | 8:20 AM
Share

विधान परिषद निवडणुकीच बिगुल वाजल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार असून या सर्व जागा स्थानाकि स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील आहेत. आजपासून म्हणजेच 25 मे ते 1 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल. पुढील महिन्याच्या 22 तारखेला, म्हणजेच 22 जून रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक पार पडणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून आली,तसेच अनेक चर्चा, रुसवेफुगवे हेही झाल्याची चर्चा होती.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठी चर्चा आणि रस्सीखेच सुरू होती. विशेषतः सर्वाधिक जागा आपल्या वाट्याला याव्यात यासाठी घटक पक्षांमध्ये अनेक बैठका, चर्चांचे फेरे आणि नाराजीचे सूरही दिसले. अखेर दीर्घ चर्चेनंतर महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून त्याच पार्श्वभूमीवर आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. विधान परिषेदसाठी अखेर महायुतीचा ठरलं असून कोणाला किती जागा मिळणार हेही फायनल झाल्याचे समजते.  सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत भाजप 12 जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाच्या शिवसेनेला 4 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देण्यात येणार आहे.

अखेर महायुतीत ठरलं

17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत खलबतं सुरू झाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून भाजपकडे 7 जागांची मागणी करण्यात आली आहे, तर भाजपने तीन ते चार जागा देण्याची तयारी दर्शवली होती. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता आम्ही सात जागांवर ठाम आहोत, अशी भूमिका या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेनं घेतल्याचे सूत्रांनी सांगितलं होतं. मात्र अखेर आता शिवसेनेच्या वाट्याला 4 च जागा आल्या आहेत असं समजतं.

शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली या मतदारसंघातील मिळून 4 जागा जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही एक जागा मिळाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, भाजपने पुणे मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे.

महायुतीतील या जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज किंवा उद्या महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अंतिम निर्णय तिन्ही प्रमुख नेत्यांकडून घेतला जाणार असल्याचं समजतं.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ