Prashant Ambi | संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून झालेल्या वादात आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रशांत आंबी यांना कथित शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयाने संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे.

प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाडांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आंबी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता न्यायालयाने चौकशीला परवानगी दिल्यानंतर गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशांत आंबी यांनी न्यायालयाचे आभार मानत पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी केली आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी संघर्ष करत होतो. संजय गायकवाड यांनी स्वतःचा आवाज असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आता चौकशीपेक्षा थेट कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, “गायकवाड यांच्या समर्थकांकडून मला धमक्या दिल्या जात आहेत. जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील,” असा आरोपही आंबी यांनी केला आहे. यापूर्वी संजय गायकवाड आणि प्रशांत आंबी यांच्यातील कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये पुस्तक छापल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
Published on: May 24, 2026 03:03 PM
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब