AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : फक्त पेट्रोल-डिझेलच नव्हे सोनंही जबरदस्त महागलं, अमेरिकेतून आलेल्या बातमीनंतर बाजारात मोठा उलटफेर

Gold Rate Today 25 May 2026 Latest News Updates in Marathi : गेल्या 11 दिवसांत भारतात आज चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मात्र फक्त इंधनाचे दरच वाढलेले नाही तर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. चांदीचे दरही लक्षणीय वर गेल्याचे दिसून आले. वाढ दिसून आली.

Gold Rate Today :  फक्त पेट्रोल-डिझेलच नव्हे सोनंही जबरदस्त महागलं, अमेरिकेतून आलेल्या बातमीनंतर बाजारात मोठा उलटफेर
| Updated on: May 25, 2026 | 8:35 AM
Share

Gold Rate Today 25 May : देशातील जनतेवर महागाईचा आघात कायम आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 2.61 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.71 रुपयांनी वाढ केली आहे. गेल्या 11 दिवसांत झालेली ही चौथी दरवाढ आहे. मात्र भारतात फक्त इंधन महाग झालेलं नाही तर अनेक आठवड्यांच्या चढ-उतारानंतर आज सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली. सोन्याचे दर आज चांगलेच वाढलेले दिसले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर महाग झाले. सोन्याचा भाव 45.29 डॉलर्सपर्यंत झपाट्याने वाढला. अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून सातत्याने घसरत असलेल्या सोन्याच्या दरात आज वाढ झाली. स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4560.95 डॉलर्सवर व्यवहार करत आहे.

किती महागलं सोनं ?

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली. अनेक आठवड्यांनंतर सोन्याचा भाव वाढून प्रति औंस 4563.37 डॉलर्सवर पोहोचला. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धपातळीवर झालेल्या करारानंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली घसरली. तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना असा दिलासा मिळतोय की युद्ध समाप्तीच्या जवळ येत आहे. मात्र यामुळेच गुंतवणूकदारांची सोन्यामधील आवड वाढली असून परिणामी या धातूच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने सोन्याला चालना मिळाली, तर चांदीच्या स्पॉट किमती 3.9 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 78.42 डॉलर्सवर

अमेरिका-इराण करारामुळे सोन्या-चांदीच्या दरात तेजी

कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे सोन्याला चांगलीच तेजी आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात एकमत होताना दिसत आहे. युरेनियम आणि होर्मुझवरील कोंडीही संपली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली असून या वृत्तांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी आणि किंमत वाढली. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या धर्तीवर, आज भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते.

Follow Us
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक.

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप