नागपूरकरांचा गौरव… देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा बॅनरबाजीवरून चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्ज शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा बॅनरबाजीवरून चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्ज शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या नागपुरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेपूर्वीच नागपूर शहरातील विविध भागांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. “नागपूरकरांचा गौरव… देवाभाऊंचा नवा विक्रम” असा मजकूर असलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
ही होर्डिंग्ज भाजप नेते संदीप जोशी यांनी लावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या आदल्या दिवशीच हे बॅनर झळकल्याने त्यामागे राजकीय संदेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांना राजकीय उत्तर देण्यासाठी किंवा डिवचण्यासाठीच ही बॅनरबाजी करण्यात आली आहे का, असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मात्र, याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे आणि या बॅनरबाजीवरून पुढे कोणत्या राजकीय प्रतिक्रिया उमटतात, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 17, 2026 12:55 PM
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..

