ईदच्या दिवशी देशात हिंसक घटना, जोधपुरात 12 तासांत 3 वेळा हिंसाचार, 10 भागांत कर्फ्यू, अनंतनाग, उ. प्रदेशातही दगडफेक

| Updated on: May 03, 2022 | 5:40 PM

जोधपूरच्या अनेक परिसरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या

ईदच्या दिवशी देशात हिंसक घटना, जोधपुरात 12 तासांत 3 वेळा हिंसाचार, 10 भागांत कर्फ्यू, अनंतनाग, उ. प्रदेशातही दगडफेक
Jodhpur Violence on Ramjan
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्लीरमजान ईदच्या ( Ramjan Eid)दिवशी देशात काही ठिकाणी गोँधळ उडाला. राजस्थानात जोधपूरमध्ये (Jodhpur, Rajasthan) हिंसाचारानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर सावधगिरीच्या दृष्टीकोनातून जोधपूर प्रशासनाने १० परिसरात संचारबंदी लागू केली आहे. दुसरीकडे सूरसागर परिसरात आमदाराच्या घरासमोरही जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागवला आहे. जोधपूरच्या अनेक परिसरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. आज दगडफेकीत एक तर काल रात्री ४ पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. हिंसेच्या विरोधात नागरिकांनी अनेक ठिकाणी हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण सुरु केले आहे. तर शहरात १० ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. यात उदय मंदिर, नागोरी गेट, सदर कोतवाली परिसर यांचा समावेश आहे. सोमवारी रात्री झेंडे आणि लाऊडस्पीकर लावण्यावरुन दोन्ही समुदायांमध्ये दगडफेक झाली. मंगळवारी सकाळीही शहराच्या जालोरी गेट परिसरात काही जणांनी एकत्रित हिंसा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

जोधपुरात सोमवारी रात्री समाजकंटकांनी २० पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड केली, यावेळी अनेक एटीएम फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यानंतर जोधपुरातील इंटरनेट बंद करण्यात आले असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उच्चस्तरीय बैठक घेवून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

मध्य प्रदेशात हिंसाचारानंतर २२व्या दिवशीही तणाव

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये दंगलीनंतर २२ दिवस उलटले तरीही कर्फ्यूतच ईदचा आणि अक्षय तृतियेचा उत्सव पार पडतोय. कर्फ्यू शिथिल करण्यात येणार नसल्याचा निर्णय पोलीस आणि प्रशासनाने एकत्रित घेतला. ईदची नमाज घरीच आदा करावी लागली, तर अक्षय तृतियेच्या दिवशी खरेदीसाठीही नागरिक घराबाहेर पडू शकलेले नाहीत. परशुराम जयंतीची शोभायात्राही काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात १३०० पोलिसांचा समावेश आहे. यात ड्रोनची मदतही घेण्यात येते आहे. अत्यावश्यक सेवांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काश्मिरात नमाज झाल्यानंतर सैन्यदलावर दगडफेक

जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात सकाळी दगडफेकीची घटना घडली. ईदची नमाज अदा केल्यानंतर, एका मशिदीच्या बाहेर दगडफेकीचा प्रकार घडला. आंदोलनकर्त्यांनी सैन्यदलावर दगडफेक केली. त्यानंतर पोलीस आणि सैन्याने परिस्थिती नियंत्रणात आणली

उ. प्रदेशात गोळीबार, दोन मुलांसह चौघे जखमी

उ. प्रदेशात संभलमध्ये ईदची नमाज अदा करुन परतत असलेल्या तरुणांवर गोळीबार झाल्याची घटना घडली. यामंतर दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दगडफेक आणि गोळीबारही करण्यात आला. या गोळीबारात दोन मुलांसह चौघेजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातमीचा व्हिडिओ