पुढच्या 5 दिवसात या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : हवामान खात्याने पुढच्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. कुठे कुठे पडू शकतो हा पाऊस जाणून घ्या.

पुढच्या 5 दिवसात या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 7:05 PM

दिल्ली पासून महाराष्ट्रापर्यंत अनेक ठिकाणी लोकं उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. लोकांना आता पावसाची प्रतिक्षा आहे. कारण उष्णतेचा पारा अनेक ठिकाणी ४५ च्या वर गेला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कडाक्याच्या उकाड्यापासून आता काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस काही राज्यांमध्ये मुसळधार वादळ आणि पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातून वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि ईशान्य आसामवर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पुढील पाच दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्ये हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पाच दिवस आणखी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील दोन दिवस वातावरण थंड राहील.

कोणत्या राज्यात पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मेघालय, पश्चिम बंगालच्या पर्वताजवळील भागात आणि सिक्कीममध्ये 6 ते 10 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात ८ ते १० जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर नागालँडमध्ये १० जूनला मुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या पाच दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटकातही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्येही पाऊस

ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त, येत्या काही दिवसांत कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात 6 ते 10 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात 6 ते 8 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या १० जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून यंदा वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. तो आता भारताच्या इतर भागात पोहोचायला सुरुवात झाली आहे. मान्सून दाखल होण्याआधी काही भागात प्री मान्सून पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. जोरदार पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिकमध्ये हा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने नाशिक रोड परिसरात जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.