पाकिस्तानला जाणारं पाणी यमुनेत वळवणार, गडकरींचं जालीम अस्त्र

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister of Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development & Ganga Rejuvenation) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. भारताच्या हक्काच्या तीन नद्यांचं पाणी आता पाकिस्तानला जाऊ देणार नसल्याचं ते म्हणाले. तीन प्रकल्प तयार करुन हे पाणी यमुना नदीत नेलं जाईल. इटावा, दिल्ली आणि आग्रापर्यंत जलमार्गाचा आराखडाही […]

पाकिस्तानला जाणारं पाणी यमुनेत वळवणार, गडकरींचं जालीम अस्त्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister of Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development & Ganga Rejuvenation) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. भारताच्या हक्काच्या तीन नद्यांचं पाणी आता पाकिस्तानला जाऊ देणार नसल्याचं ते म्हणाले. तीन प्रकल्प तयार करुन हे पाणी यमुना नदीत नेलं जाईल. इटावा, दिल्ली आणि आग्रापर्यंत जलमार्गाचा आराखडाही तयार आहे. बागपतमध्ये रिव्हर पोर्ट तयार केलं जाईल, असंही गडकरींनी सांगितलं. शिवाय शेतकऱ्यांनी पीकचक्र बदललं आणि ऊसापासून इथेनॉल निर्मिती केली तर रोजगार आणि उत्पन्न दोन्हींमध्ये वाढ होईल, असं गडकरी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील एका प्रकल्पाचा शुभारंभ करताना गडकरींनी ही घोषणा केली. रस्त्यांसोबतच जलमार्ग तयार करण्यावरही सरकारकडून काम सुरु असल्याची माहिती गडकरींनी दिली. भारताच्या अधिकारात असलेल्या तीन नद्यांचं पाणी यमुनेत आणलं जाईल. हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशाचे लोक दिल्लीहून आग्राला जलमार्गाने जाऊ शकतील, असा दावाही गडकरींनी केला.

वाचाना युद्ध, ना लढाई, हे शस्त्र वापरून पाकिस्तानला गुडघे टेकायला लावा

रिव्हर पोर्टही बागपतमध्ये यमुनेच्या किनाऱ्यावर बनवण्याचा विचार असल्याचं गडकरींनी सांगितलं. यामुळे साखर बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत पाठवली जाईल, ज्यामुळे खर्चातही बचत होईल. प्रयागराजपासून वाराणसीपर्यंत जलमार्ग तयार आहे. लवकरच यामध्ये बोटी चालवल्या जातील. एका बोटीतून 14 जण एकाच वेळी जाऊ शकतात. गंगेसोबतच यमुना, हिंडन आणि कालीसह इतर नद्या आणि नाल्यांचं पाणीही नमामी गंगे मिशनअंतर्गत स्वच्छ केलं जाईल, असं गडकरी म्हणाले.

यमुनेत पाणी वळवणं खरंच शक्य आहे का?

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीत या करारावर स्वाक्षरी केली होती. जागतिक बँकेने या करारासाठी मध्यस्थी केलेली आहे. या करारानुसार, सिंधू खोऱ्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले. सतलज, व्यास आणि रावी या नद्या पूर्व खोऱ्यात, तर सिंधू, झेलम, चिनाब या नद्या पश्चिम खोऱ्यात येतात. पूर्व खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी हवं तितकं वापरण्याचा अधिकार भारताला आहे. पश्चिम खोऱ्यातल्या पाण्यावर काही बंधनं आहेत. कारण, पश्चिम खोऱ्यातलं पाणी पाकिस्तानला जातं.

भारताने पाकिस्तानसोबत पाण्यासाठी आतापर्यंत कधीही वाद घातला नाही. कारण, प्रश्न पाण्याचा आहे. उदारपणा दाखवत भारताने मोठ्या मनाने पाकिस्तानला पाणी दिलं. आपण बांगलादेशलाही पाणी देतो. पण ज्या देशाचं पाणी आपण पितो त्याच देशाविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला पाणी देऊ नये, अशी भूमिका याअगोदर अनेक राज्यकर्त्यांनी आणि अभ्यासकांनी घेतलेली आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.