AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींचा खेला करणारे ऋतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण? दोन पक्षांमधून झाली होती हकालपट्टी

Who is Ritabrata Banerjee : 58 आमदारांचा गट आता ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळा झाला आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. ऋतब्रत बॅनर्जी नेमके कोण आहेत ते जाणून घेऊयात.

ममता बॅनर्जींचा खेला करणारे ऋतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण? दोन पक्षांमधून झाली होती हकालपट्टी
who is ritabrata Banerjee tmc rebel leaderImage Credit source: Google
| Updated on: Jun 03, 2026 | 6:02 PM
Share

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. टीएमसीमध्ये उभी फूट पडली आहे. 58 आमदारांचा गट आता ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळा झाला आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र त्यानंतर पक्षात बंडाळी उफाळून आली आहे. आता ऋतब्रत बॅनर्जी हे विरोधीपक्षनेते असणार आहेत.

ऋतब्रत बॅनर्जी नवे विरोधीपक्षनेते

समोर आलेल्या माहितीनुसार, 80 पैकी 60 आमदारांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्य करण्यास नकार दिला होती. त्यानंतर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 58 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांची भेट घेतली. आम्हीच टीएमसीचा खरा गट आहोत आणि ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदाची मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. आमदारांच्या मागणीचा विचार करून विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. हा बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहेत ऋतब्रत बॅनर्जी?

ऋतब्रत बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना एसएफआयमधून केली होती. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऋतब्रत बॅनर्जी हे उलुबेरिया पूरबा विधानसभा मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार रुद्र प्रसाद बॅनर्जी यांचा 11,838 मतांनी पराभव केला होता.

दोन वेळा राज्यसभा खासदार

यापूर्वी ते दोन वेळा राज्यसभा सदस्य राहिले आहेत. सुरुवातीला ते सीपीआय (एम) पक्षाकडून 2017 मध्ये राज्यसभेवर गेले होते. मात्र नंतर त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आणि 2024 मध्ये पक्षाकडून 15 महिन्यांसाठी राज्यसभा खासदार बनले होते. आता त्यांनी वेगळा गट स्थापन करत ममता बॅनर्जी यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली होती.

दोन पक्षातून हकालपट्टी

ऋतब्रत बॅनर्जी यांना पक्षातून बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून सीपीआय (एम)ने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. आता टीएमसीनेही त्यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप करत पक्षातून बाहेर काढले आहे. मात्र आता त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप