AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ!

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. लोकांनी त्यांच्या ममता बॅनर्जी यांच्या गाडीवर चिखल आणि चप्पल, बूट फेकले आहेत.

Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ!
mamata banerjee convoy attackImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 3:57 PM
Share

Mamata Banerjee Convoy Attack : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेहमीच चर्चेत असतात. हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक खासदार, आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा नवसंजीवनी यावी यासाठी त्या राज्यभर फिरत आहेत. लोकांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील हलिशहर येथे दौऱ्यावर असताना बॅनर्जी यांच्या ताफ्यावर लोकांनी हल्ला केला आहे. त्यांच्या कारवर बूट भिरकावण्यात आले आहेत. सोबतच त्यांच्या कारच्या दिशेने चिखलफेकही झाली आहे. या घटनेनंतर बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी आज (9 ऑगस्ट) उत्तर 24 परगना येथील हलिशहर येथे गेला होत्या. यावेळी त्यांच्या ताफ्यावर लोकांनी हल्ला केला. हलिशहर या भागात तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. याच कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची ममता बॅनर्जी भेट घ्यायला गेल्या होत्या. त्याच वेळी संतापलेल्या गर्दीने बॅनर्जी यांना मध्येच आडवले आणि यांच्या ताफ्यावरच हल्ला केला.

बॅनर्जी यांच्याविरोधात नारेबाजी

लोकांच्या गर्दीने ममता बॅनर्जी यांच्या गाडीला चारही बाजूंनी घेरलं. जमलेल्या लोकांनी त्यांच्या गाडीवर चिखलफेक केली. तसेच पाण्याच्या बॉटल, चप्पलही ममता बॅनर्जींच्या गाडीवर भिरकावण्यात आल्या. यावेळी संतापलेल्या लोकांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नारेबाजी केली. लोकांची आक्रमकता पाहून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवले. लगेच ममता बॅनर्जी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आयुष्यात अशा प्रकारचा हल्ला मी कधीच पाहिला नाही. पोलिसांच्या संरक्षणात हे सगळं झालं. पोलीस भाजपाच्या लोकांना संरक्षण देतात, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकार नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत