AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी तिच्या शरीराचे लचके तोडले, नंतर… 12 वर्षांच्या चिमुकलीसोबत आक्रित घडलं; संपूर्ण देश हादरला

Minor Girl Murdered : बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बरुईपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे.

आधी तिच्या शरीराचे लचके तोडले, नंतर... 12 वर्षांच्या चिमुकलीसोबत आक्रित घडलं; संपूर्ण देश हादरला
West Bengal Crime NewsImage Credit source: Google
| Updated on: Jul 05, 2026 | 7:05 PM
Share

गेल्या काही काळापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. आता पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बरुईपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांची मुलगी शनिवारी सायंकाळी दुकानातून सामान आणण्यासाठी गेली होती, मात्र ती परतलीच नाही. कुटुंबीयांचा आरोप आहे की, चार जणांनी तिला जबरदस्तीने उचलून नेले. रविवारी सकाळी घराजवळील तलावातून तिचा मृतदेह सापडला. नातेवाईकांनी दावा केला आहे की, मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि नंतर मृतदेह तलावात फेकण्यात आला.

रास्ता रोको, रेल रोको

चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आम्ही मुलीला संशयितांसोबत जाताना पाहिले होते, त्यामुळे लोकांचा रोष आणखी वाढला. या घटनेचा निषेध म्हणून नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले आणि सूर्यपूर स्थानकाजवळ रेल्वे रुळांवरही ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सियालदह-नामखाना रेल्वेमार्गावरील सेवा सुमारे एका तासासाठी विस्कळीत झाली होती. तर जवळपास पाच तास रस्ता बंद होता.

दोघांना अटक

या आंदोलनावेळी जमावाने एका युवकाला मारहाणही केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलकांनी दगडफेक केली असून त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आता या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली असून, आणखी एका संशयिताला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

आरोपींना कठोर शिक्षा होणार

या घटनेनंतर बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पीडित मुलीच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. अधिकारी यांनी पीडित कुटुंबाला मंगळवारी भवानी भवन येथे बोलावले आहे. या घटनेनंतर बोलताना आयजी कंकर प्रसाद बारुई यांनी सांगितले की, ‘या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. शवविच्छेदन लवकरात लवकर करण्यात येईल आणि गरज पडल्यास त्याची व्हिडिओग्राफीही केली जाईल. सर्व आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा मिळवून देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.’

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा