AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला काय वाटतं CCTV तुमच्या सुरक्षेसाठी असतात? मग ही बातमी वाचाच, कॅमेरे घरातून काढून फेकून द्याल

अनेक जण आपल्या घरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेर लावतात. मात्र याच कॅमेऱ्यांमुळे तुम्ही मोठ्या अडचणीत देखील सापडू शकतात. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, असेच काही भयंकर प्रकार समोर आले आहेत.

तुम्हाला काय वाटतं CCTV तुमच्या सुरक्षेसाठी असतात? मग ही बातमी वाचाच, कॅमेरे घरातून काढून फेकून द्याल
CCTV TVImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 9:49 PM
Share

लोक घरात सीसीटीव्ही का लावतात? तर तो घराच्या सुरक्षेसाठी लावतात. तुम्ही जेव्हा कुठे बाहेर गेला आहात, घरी नाही आहात, अशावेळी तुमच्या घरात किंवा परिसरात काही दुर्घटना घडली, चोरी झाली तर आपण तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सहज आरोपीला पकडू किंवा तिथे नेमकं काय काय घडलं? हे आपल्याला पहाता यावं या विचारने अनेकजण आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात. मात्र याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तुमच्या आयुष्यात भूकंप देखील येऊ शकतो? हे तुम्हाला माहिती आहे का? असाच एक प्रकार दिल्ली पोलिसांनी समोर आणला आहे, ही बातमी समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठ लोकांना अटक केली आहे. या आठ लोकांच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या आरोपींना अटक करण्यात आलं आहे, त्यांचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. पोलीस चौकशीमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, या लोकांनी पाकिस्तानमध्ये बसलेल्या आपल्या साथीदारांच्या सांगण्यावरून अनेक ठिकाणी सोलर पॅनलवाले सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, त्यानंतर ते या कॅमेऱ्याचं फीड थेट पाकिस्तानात पाठवत होते. हे कॅमेरे अनेक सेंसेटीव्ह आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी लावण्यात आले होते. चौकशीतून समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे आता पोलिसांची देखील झोप उडाली आहे.

आणखी एका दुसऱ्या प्रकरणात अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, हे प्रकरण 2025 मधलं आहे. एका युट्यूब चॅनलवर राजकोटमधील एका हॉस्पिटलमधील व्हिडीओ व्हायरल झाले होते, या व्हिडीओमध्ये गर्भवती महिलांवर त्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले वैद्यकीय उपाचार दाखवण्यात येत होते. एवढंच नाही तर त्यांना इंजेक्शन देण्याची क्रिया देखील दाखवण्यात आली होती, या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली, जेव्हा सत्य परिस्थिती समोर आली तेव्हा पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली, या हॉस्पिटलमधील सर्व कॅमेरे हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...