लॉरेन्स बिश्नोईवर परिवाराकडून लाखोंचा खर्च, का बदलले त्याने नाव? भावाने उघडले राज

lawrence bishnoi original name: कॅनडाच्या पोलिसांनाही लॉरेन्स बिश्नोई हवा आहे. त्या ठिकाणी सुरु असलेल्या कारवायांमध्ये लॉरेन्स टोळीचा संबंध असल्याचा दावा कॅनडाचा आहे. मात्र, भारत सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

लॉरेन्स बिश्नोईवर परिवाराकडून लाखोंचा खर्च, का बदलले त्याने नाव? भावाने उघडले राज
lawrence bishnoi
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 10:04 AM

why lawrence bishnoi change name: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नाईचे नाव समोर आले आहे. त्यानंतर त्याची चर्चा देशभर सुरु झाली आहे. कारागृहात असलेल्या या गँगस्टरसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली. त्याच्या परिवाराकडून ही माहिती दिली गेली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा परिवार त्याच्यावर महिन्याला 35 ते 40 लाख रुपये खर्च करतो, अशी माहिती त्याचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई यांनी दिली. 50 वर्षीय रमेश बिश्नोई यांनी लॉरेन्स बिश्नोईसंदर्भात अनेक राज उघड केले.

वर्षाला 35 ते 40 लाख रुपये खर्च

रमेश बिश्नोई यांनी सांगितले की, लॉरेन्स हा पंजाब विद्यापीठातील विधी शाखेचा पदवीधर आहे. पुढे जाऊन तो गँगस्टर होईल, असे स्वप्नही कोणाला पडले नाही. लॉरेन्सचे वडील हरियाणा पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. त्यांच्याकडे गावात 110 एकर जमीनसुद्धा होती. त्याला नेहमी महाग कपडे आणि शूज वापरण्याची हौस होती. तो आता कारागृहात असला तरी त्याच्या देखभालीसाठी परिवाराकडून मोठा खर्च होतो. वर्षाला जवळपास 35 ते 40 लाख रुपये त्याच्यावर खर्च केले जात आहे.

असे पडले लॉरेन्स नाव

लॉरेन्स बिश्नोईचा जन्म पंजाबमधील फिरोजपूरमध्ये झाला. त्याचे खरे नाव बलकरन बरार होते. शाळेत असताना त्याने आपले नाव बदलून लॉरेन्स केले. त्याची काकू त्याला सांगत होती, तुझ्यावर लॉरेन्स नाव अधिक चांगले वाटते. त्यामुळे त्याने लॉरेन्स बिश्नोई नाव घेतले. आता हे नाव हायप्रोफाईल खटल्यामध्ये जोडले गेले आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या कुठे आहे लॉरेन्स बिश्नोई

कॅनडाच्या पोलिसांनाही लॉरेन्स बिश्नोई हवा आहे. त्या ठिकाणी सुरु असलेल्या कारवायांमध्ये लॉरेन्स टोळीचा संबंध असल्याचा दावा कॅनडाचा आहे. मात्र, भारत सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यापूर्वी मे 2022 मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नावही समोर आले होते. बिष्णोई टोळीने मूसवाला यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या तो गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती कारागृहात आहे. गुजरात एटीएस आणि राष्ट्रीय तपास संस्था त्याची चौकशी करत आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.