AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉरेन्स बिश्नाईचा गुरु कोण? कोणाला समजतो तो आपला हिरो? चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने उघडले राज

lawrence bishnoi jail: बिश्नाई गँगमध्ये सदस्य किती हे सांगता येत नाही. परंतु चौकशीत त्याने आपण कुठूनही कोणताही कामगिरी फत्ते करु शकतो, असे त्याने म्हटले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बिश्नोईचा जवळचा सहयोगी संपत नेहरा हरियाणामधील ऑपरेशन पाहतो.

लॉरेन्स बिश्नाईचा गुरु कोण? कोणाला समजतो तो आपला हिरो? चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने उघडले राज
Lawrence Bishnoi
| Updated on: Oct 21, 2024 | 10:05 AM
Share

Lawrence Bishnoi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नाई याच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. तो गुजरातमधील साबरमती कारागृहात बंद आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात तोच असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन वर्षांत तीन मोठ्या हत्या त्याने घडवून आणल्या. यामुळे देशातच नाही तर कॅनडा पोलिसांनाही त्याची कस्टडी हवी आहे. 2022 मध्ये पंजाबमधील मानसा गावात पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येप्रकरणात त्याचे नाव समोर आले. त्यानंतर 2023 मध्ये कॅनडामधील खलिस्तानवादी अतिरेकी हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात त्याचे नाव जोडले गेले आहे. त्यानंतर आता बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध असल्याचे समोर येत आहे. कोण आहे हा लॉरेन्स बिश्नोई? त्याचा गुरु किंवा हिरो कोण आहे?

कोण आहे लॉरेन्सचा गुरु

लॉरेन्स बिश्नोई याचा हिरो किंवा गुरु संदर्भात ह‍िंदुस्‍तान टाइम्‍समध्ये रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार लॉरेन्स बिश्नोई यांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. एका डीएसपी नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्यानुसार गुन्हेगारी जगात लॉरेन्स बिश्नोई याचा कोणीही गुरु नाही. तो स्वत:ला मोठा हिरो समजतो.

कारागृहात इतरांसोबत…

लॉरेन्स बिश्नोईची तीन वेळा चौकशी करणारा अधिकारी म्हणाला, लॉरेन्स बिश्नोई याने बुडैल, बठिंडा, पटियाला, तिहार, गुजरात आणि राजस्थानमधील कारागृहात अनेक दिवस राहिला आहे. कारागृहात त्याला एकटे ठेवले नाही. त्यामुळे कारागृहात असलेल्या इतर गँगस्टरसोबत त्याने संबंध निर्माण केले आहे. पंजाबमधील अनेक युवक विदेशात आणि कॅनडात आहे. बिश्नोई त्यांच्याकडून आपले कामे करुन घेतो. तो कोणत्याही देशात कोणतीही काम करु शकतो, अशी त्याची गँग तयार झाली आहे.

असे चालते गँगचे कामकाज

बिश्नाई गँगमध्ये सदस्य किती हे सांगता येत नाही. परंतु चौकशीत त्याने आपण कुठूनही कोणताही कामगिरी फत्ते करु शकतो, असे त्याने म्हटले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बिश्नोईचा जवळचा सहयोगी संपत नेहरा हरियाणामधील ऑपरेशन पाहतो. गोल्डी बरार हा अमेरिकेत राहतो. तो भारताच्या बाहेरची जबाबदारी आणि पंजाबमधील कामगिरी पार पाडतो. दीपक कुमार उर्फ​टीनू, रवींदर उर्फ ​काली राजपूत आणि संदीप उर्फ ​काला जठेरी हे लॉरेन्स बिश्नोई याचे जवळचे सहकारी आहे. गोल्डी बरार सोडून इतर सर्व जण कारागृहात आहेत.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.