AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाइप सी चार्जरमधील C चा नेमका अर्थ काय? भल्याभल्यांना माहीत नाही, तुम्ही पण करा ट्राय

तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी टाइप सी चार्जर वापरत असालच, कारण सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हेच चार्जर उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहितीये का? टाइप सी चार्जरमधील सीचा नेमका अर्थ काय होतो?

टाइप सी चार्जरमधील C चा नेमका अर्थ काय? भल्याभल्यांना माहीत नाही, तुम्ही पण करा ट्राय
chargerImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 11, 2026 | 9:05 PM
Share

आजच्या काळात मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रानिक्स वस्तू या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. मात्र या इलेक्ट्रानिक्स वस्तूंना चार्जिंगची गरज असते. मोबाईल, लॅपटॉप, ब्लूटूथ इअर फोन आणि इतर इलेक्ट्रनिक्स वस्तूंना चार्ज करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत. त्यांचा आकार, त्यांच्या पिनची रचना यावरून त्याला टाइप ए, टाइप बी, टाइप सी अशी नावं पडली आहेत. गंमत म्हणजे आजच्या काळात सर्वत्र टाइप सी चार्जर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. तु्म्ही देखील तुमचा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी टाइप सी चार्जरचाच वापर करत असाल. मात्र तरी देखील टाइप सी चार्जारमधील सी चा नेमका अर्थ काय होतो? हे तुम्हाला देखील सांगता येणार नाही. परंतु जेव्हा आपण एखादं डिव्हाइस किंवा वस्तू वापरतो, तेव्हा तिच्याबद्दल सर्व प्रकारची माहिती असणं गरजेचं असतं.

टाइप सी हे एक प्रकारचं यूएसबी (USB) कनेक्टर आहे. ज्याला तांत्रिक भाषेमध्ये USB Type-C असं म्हटलं जातं. आता तुम्ही विचार कराल की, टाइप सी चार्जरमधील सी चा नेमका काय अर्थ होतो? तर टाइप सी मधील सी हे कोणत्याही नावाचा शॉर्टफॉर्म नाहीये. तर तो USB कनेक्टरच्या डिझाइनचा एक प्रकार आहे. जेव्हा मार्केटमध्ये टाइप सी चार्जर उपलब्ध नव्हतं तेव्हा बाजारात टाइप ए टाइप बी USB कनेक्टर होते, अर्थात त्यांच्या कनेक्टरच्या आकारावरूनच त्यांनी ए बी असे नावं देण्यात आले होते. मात्र आता मार्केटमध्ये टाइप सी कनेक्टर अर्थात चार्जर आलं आहे. त्याच्या पिनेच्या आकारावरून ए आणि बी चं अपग्रेड व्हर्जन म्हणून त्याला टाइप सी असं नाव देण्यात आलं आहे. याचाच अर्थ टाइप सी हे कोणत्याही शब्दाचं संक्षिप्त रुप नाहीये तर चार्जरच्या आकारावरून त्याला ते नाव देण्यात आलं आहे.

टाइप सी चार्जर एवढं लोकप्रिय का ठरलं तर त्यामागे त्याची युनिक डिझाइन आहे. तुम्ही इतर चार्जर फक्त एकाच बाजूने युज करू शकता, मात्र टाइप सी चार्जर हे असं चार्जर आहे, त्याच्या कनेक्टरची रचनाच अशी आहे की, तुम्ही त्याचा वापर दोन्ही बाजुने करू शकता. जुने चार्जर मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी काही समस्या येत होत्या, मात्र टाइप सी चार्जमुळे या सर्व प्रकारच्या समस्या दूर झाल्या आहेत. टाइप सी चार्जरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल अधिक जलद चार्ज करू शकता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...