मी जमिनीवर फेकलेले पैसे उचलत नाही… आमदाराच्या लेकीच्या लग्नातील नृत्यांगना चर्चेत

MLA अनंत सिंग यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहिलेली नृत्यांगना अर्चना तिवारी सध्या चर्चेत आहे. स्टेजवर पडलेले पैसे तिने स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे तिची चर्चा रंगली आहे.

मी जमिनीवर फेकलेले पैसे उचलत नाही... आमदाराच्या लेकीच्या लग्नातील नृत्यांगना चर्चेत
who is dancer archana tiwari
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 3:20 PM

बिहारचे बाहुबली नेते आणि मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह यांच्या लग्नाची खूप चर्चा होती. लग्नातील शाही व्यवस्था, पाहुण्यांची गर्दी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच व्हिडीओंमध्ये एक डान्सरही दिसली. पण ही नृत्यांगना तिच्या डान्समुळे नाही तर एका वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत आहे. आता नेमकं काय? वाचा…

खरे तर, अनंत सिंह यांच्या कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांनी तिच्यावर भरपूर नोटा उडवल्या, पण जेव्हा एका व्यक्तीने जमिनीवर पडलेले पैसे उचलून तिला देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने हात जोडून घेण्यास नकार दिला. या डान्सरचे नाव अर्चना तिवारी आहे. चला जाणून घेऊयात अर्चना तिवारी कोण आहेत आणि तिने आपली ओळख कशी निर्माण केली?

Loading...

अर्चना तिवारी कोण आहेत?

अर्चना तिवारी बिहार आणि पूर्वांचलमध्ये स्टेज डान्सर, गायिका म्हणून लोकप्रिय आहे. ती प्रामुख्याने स्टेज शो, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाजगी समारंभांमध्ये नृत्य करते. सोशल मीडियावरही तिचे डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. अर्चना तिवारीच्या मते, तिला लहानपणापासूनच डान्स करण्याची आवड होती. तिने कमी वयातच नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती. हळूहळू ही आवड तिच्या करिअरचा भाग बनली.

अर्चना तिवारी स्वतःला प्रशिक्षित डान्सर म्हणवते आणि तिच्या मते तिने नृत्यात डिग्री घेतली आहे. तिने कथकसह शास्त्रीय नृत्याचेही शिक्षण घेतले आहे. अर्चना म्हणते की, डान्स तिच्यासाठी केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तिची आवड आणि व्यवसायही आहे. याद्वारेच तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेज कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करते.

मुंबईत राहते अर्चना तिवारी

अर्चना तिवारी सध्या मुंबईत राहून आपले काम करत आहे. मात्र तिचे काम केवळ मुंबई किंवा बिहारपुरते मर्यादित नाही. ती देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आयोजित होणाऱ्या लग्न समारंभ, खाजगी कार्यक्रम आणि सांस्कृतिक आयोजनांमध्ये परफॉर्म करते. तिच्या मते, भारताबाहेरही तिला तिची कला दाखवण्याची संधी मिळाली आहे. तिने दुबई, रशिया आणि मॉरिशससारख्या देशांतही डान्स कार्यक्रम केले आहेत.

अर्चना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ती आपले डान्स शो आणि रिहर्सलशी संबंधित व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अकाउंट ‘tiwari7744’ या नावाने आहे. डान्सशिवाय तिला ड्रेस डिझाइनिंग आणि अभिनयातही रस आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us