AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडी नेसून AK-47 चालवणारी IPS अंकिता शर्मा कोण? माजी लेफ्टनेंट जनरल म्हणाले…

छत्तीसगडमधील राजनांदगावच्या पोलीस अधीक्षक (IPS) अंकिता शर्मा यांचा विजयादशमीच्या निमित्ताने AK-47 मधून गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यावर लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लों यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

साडी नेसून AK-47 चालवणारी IPS अंकिता शर्मा कोण? माजी लेफ्टनेंट जनरल म्हणाले...
| Updated on: Oct 21, 2026 | 2:26 PM
Share

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये IPS अंकिता शर्मा साडी नेसून AK – 47 चालवताना दिसत आहेत. यावर माजी लेफ्टनेंट जनरल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, छत्तीसगडमधील राजनांदगावच्या पोलीस अधीक्षक (IPS) अंकिता शर्मा यांचा विजयादशमीच्या निमित्ताने AK-47 मधून गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये साडी नेसलेल्या अंकिता शर्मा शस्त्रपूजनानंतर रायफलमधून एकामागून एक गोळ्या झाडताना दिसत आहेत. व्हिडीओवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लों यांनी शस्त्रे हाताळण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम बेजबाबदारपणाचा असल्याचं म्हटले असून, शस्त्रांच्या वापरात सुरक्षेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

ढिल्लों यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये याबद्दल लिहिलं आहे. व्हिडिओमध्ये शस्त्र अत्यंत असुरक्षित पद्धतीने हाताळले जात असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या मते, लोडेड शस्त्र वेगवेगळ्या दिशेने फिरवणं, आसपास उपस्थित लोकांच्या सुरक्षेला धोक्यात आणणं आणि वेपन हँडलिंग ड्रिलचं पालन न करणं ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्यांनी अशा प्रकरणांमध्ये शिस्तभंगाची कारवाई करण्याची गरजही व्यक्त केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण…

विजयादशमीच्या निमित्ताने छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील पोलीस लाईन्समध्ये शस्त्रपूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान एसपी अंकिता शर्मा देखील उपस्थित होत्या. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्या साडीत AK-47 रायफलीसह दिसत आहेत. शस्त्रपूजनानंतर त्या रायफलमधून हवेत गोळीबार करताना दिसल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओमध्ये त्यांनी एकापाठोपाठ एक नऊ राऊंड फायर केले. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला.

शस्त्रपूजा ही विजयादशमीशी जोडलेली एक जुनी परंपरा आहे. पोलीस आणि लष्करी दलांमध्येही या प्रसंगी शस्त्रांची पूजा केली जाते. परंतु, पूजा करणं आणि प्रत्यक्ष शस्त्र चालवणं यामध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. शस्त्र चालवण्यासाठी निर्धारित सुरक्षा प्रक्रिया, अधिकृत जागा आणि संबंधित नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. याच फरकावर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोण आहे अंकिता शर्मा?

अंकिता शर्मा या 2018 च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवा अधिकारी असून त्या छत्तीसगड केडरच्या आहेत. सध्या त्या राजनांदगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या छत्तीसगडमधील दुर्ग येथील रहिवासी आहेत. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. 2017 च्या परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतात 203 वा क्रमांक मिळवला आणि त्यानंतर त्या 2018 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी बनल्या.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात