AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणतंही पार्सल पॅक करण्यासाठी खाकी रंगाचाच बॉक्स का वापरला जातो? 99 लोकांना माहीत नसेल खरं कारण

तुम्ही अनेकदा एखादी वस्तू ऑनलाईन ऑर्डर करता. जेव्हा कंपनी ते पार्सल तुमच्या घरी पाठवते तेव्हा ते फक्त खाकी कलरच्याच रॅपरमध्ये पॅक केलेलं असतं. त्यासाठी खाकी रंगाचा बॉक्ससच वापला जातो. या मागे नेमकं काय कारण असू शकतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

कोणतंही पार्सल पॅक करण्यासाठी खाकी रंगाचाच बॉक्स का वापरला जातो? 99 लोकांना माहीत नसेल खरं कारण
parcelImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 9:01 PM
Share

गेल्या दशकभरात ई-कॉमर्स साईट्सची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात ई-कॉमर्स साइट्सचं जाळ पसरलं आहे. मार्केटमध्ये नव्या-नव्या ई-कॉमर्स साईट येत आहेत. या साईट्समध्ये एक प्रकारची स्पर्धा लागली आहे. ग्राहकांना अधिक स्वस्त आणि आकर्षक पद्धतीने सामान या साईट्सच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. काही साईट्स तर अशा आहेत, तुम्ही तु्म्हाला हवं असलेलं सामान ऑर्डर केलं की पुढच्या पाच ते सहा मिनिटांमध्ये ते सामान या कंपन्यांच्या माध्यमातून तुमच्या घरी पोहोचवलं जातं. त्यामुळे आजाकाल ग्राहक हे ऑनलाईन खरेदीलाच जास्त प्राधान्य देताना दिसून येत आहेत. यामुळे दुकानदारांचा मोठा तोटा होत असल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे ई-कॉमर्स साईट्सवरून वस्तू खरेदी करण्याचा कल वाढला आहे. पण तुम्ही कधी एका गोष्टीचं निरीक्षण केलं आहे का? तुमच्या घरी जेवढं काही अशा ई-कॉमर्ससाईट्सच्या माध्यमातून सामान येतं किंवा कोणतंही पार्सल येतं तर त्याच्या रॅपरचा रंग हा खाकीच का असतो? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का?

आतापर्यंत तुम्ही अनेकदा ई-कॉमर्स साईट्स वरून तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंची ऑर्डर केली असेल. यामध्ये कपडे, पुस्तक किंवा इतर खाद्य पदार्थ अशा कोणत्याही गोष्टींचा समावेश असू शकतो. या वस्तू नेहमी ई-कॉमर्स साईट्सकडून तुम्हाला खाकी कलरच्या रॅपरमध्येच दिल्या जातात. मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का की कोणत्याही पार्सलसाठी वस्तू पॅक करण्यासाठी खाकी कलरचाच वापर का केला जातो? तुमच्या घरी येणारं पार्सल लहान असो अथवा मोठं अगदी मोठ्या -मोठ्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू देखील खाकी कलरच्या रॅपरमध्येच पॅक केलेल्या असतात. ग्राहकांना मिळणारं पार्सल हे अधिक आकर्षक दिसावं यासाठी ते रंगीबेरंगी रॅपरमध्ये देखील पॅक करू शकतात परंतु त्यासाठी केवळ खाकी कलरचंच रॅपर वापरलं जातं.

ई-कॉमर्स कंपन्यांकडून येणारे पार्सल किंवा इतर कोणत्याही ठिकाणावरून येणारे पार्सल हे खाकी कलरचेच का असतात? त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे पार्सल तयार करण्यासाठी जो बॉक्स वापरला जातो तो बॉक्स बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या क्राफ्ट पेपरचा वापर केला जातो. हे क्राफ्ट लाकडाच्या भुग्यापासून तयार केले जाते. त्यामुळे यापासून जो कागद तयार होतो, त्याचा कलर देखील खाकीच असतो. त्यामुळे कोणतंही पार्सल पॅक करण्यासाठी खाकी रांगाचंच पेपर वापरला जातो.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...