होय, मॅगीत शिशांचं प्रमाण अधिक, सुप्रीम कोर्टात कबुली

मुंबई: मॅगीवर पुन्हा एकदा संकट आलेलं आहे.  2015 मध्ये मॅगीवरुन सुरु झालेला वाद गुरुवारी पुन्हा एकदा गरम झालेला दिसला. नेस्ले कंपनीच्या वकिलांनी 2015 मध्ये मॅगीत शिशांचं प्रमाण अधिक होतं हे सुप्रीम कोर्टात मान्य केलं. यानंतर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी तीन वर्षानंतर पुन्हा मॅगीवर कारवाई करण्याची परवानगी सरकारला दिली. ज्यामुळे नेस्लेला मोठा धक्का बसला आहे. मॅगीत शिशांचं …

होय, मॅगीत शिशांचं प्रमाण अधिक, सुप्रीम कोर्टात कबुली

मुंबई: मॅगीवर पुन्हा एकदा संकट आलेलं आहे.  2015 मध्ये मॅगीवरुन सुरु झालेला वाद गुरुवारी पुन्हा एकदा गरम झालेला दिसला. नेस्ले कंपनीच्या वकिलांनी 2015 मध्ये मॅगीत शिशांचं प्रमाण अधिक होतं हे सुप्रीम कोर्टात मान्य केलं. यानंतर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी तीन वर्षानंतर पुन्हा मॅगीवर कारवाई करण्याची परवानगी सरकारला दिली. ज्यामुळे नेस्लेला मोठा धक्का बसला आहे.

मॅगीत शिशांचं प्रमाण अधिक आढळल्यामुळे तीन वर्षांपूर्वी मॅगीवर बंदी घातली होती. ही बंदी काही काळाने उठवली. आता पुन्हा एकदा मॅगी आणि सरकार आमने समाने आलेले आहेत. शीशांचे प्रमाण जास्त आढळल्याने ही कारवाई मॅगीवर करण्यात येत आहे. मॅगीची काही पाकिटं म्हैसूर येथील केंद्रीय खाद्य प्रद्योगिकी संस्थानात पाठवण्यात आली आहेत. त्यांच्या रिपोर्टनुसार मॅगीवर कारवाईबाबत ठरवावं, असं न्यायाधीश डी. वाई. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावलं होतं.

 काय आहे नेमकं प्रकरण ?

मॅगीवर आक्षेप घेत 2015 मध्ये ग्राहक तक्रार निवारण केंद्रात धाव घेण्यात आली होती. ग्राहक हक्क मंत्रालयाने नेस्ले इंडियाविरोधात ही तक्रार दाखल केली होती. त्यावेळी मॅगीवर 640 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. मात्र सरकारच्या या कारवाईला नेस्ले इंडियाने आक्षेप घेतला होता. मॅगीमध्ये मानकांनुसारच शीशांचं प्रमाण आहे, अतिरिक्त शिसे नाहीत, असा दावा त्यावेळी मॅगीने केला होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने एनसीडीआरसीच्या सुनावणीवर स्थगिती आणली होती. त्यादरम्यान मॅगीला देशभरात विरोध झाला होता. त्यानंतर हळूहळू मॅगीने पुन्हा बाजारात पुनरागमन केलं. पण आता खुद्द नेस्लेच्या वकिलांनीच मॅगीमध्ये तेव्हा अतिरिक्त शीसं होतं हे मान्य  केलं.

मॅगीमधील शीशांमुळे काय नुकसान होते?

शीसे हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत.  अतिरिक्त शिशांमुळे शरिरातील रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकते. तसंच सांधेदुखी, किडनी, लिव्हर धोका अशा समस्या उद्भवू शकतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *