AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोचे डिलिव्हरी बॉयसोबत शारीरिक संबंध, चॅट वाचून नवरा थरथर कापू लागला, पळ घराबाहेर पडला

काही दिवसांपासून बायकोचे वागणे बदलले होते. त्यामुळे नवऱ्याला संशय आला. त्याने बायकोचा फोन चेक केला आणि धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर तो जीव मुठीत घेऊन घरातून बाहेर पडला. नेमकं काय घडलं होतं? वाचा...

बायकोचे डिलिव्हरी बॉयसोबत शारीरिक संबंध, चॅट वाचून नवरा थरथर कापू लागला, पळ घराबाहेर पडला
wife affairImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 09, 2026 | 2:46 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. सोनम रघुवंशी प्रकरण, सिया गोयल प्रकरण आणि इतर अशीच बरीच प्रकरणे याचे उदाहरण आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नवऱ्याला त्याच्या बायकोचे डिलिव्हरी बॉयसोबत शारीरिक संबंध असल्याचे कळाले. त्यानंतर त्याने बायकोचा फोन तपासला. त्यामधील चॅट वाचल्यानंतर तो तातडीने घरातून बाहेर पडला आणि पोलिस ठाण्यात गेला. तेथे त्याने तक्रार दाखल केली.

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील आहे. इथे एका महिलेने तिच्या कथित प्रियकरासोबत मिळून स्वतःच्या पतीलाच मार्गातून दूर करण्याचा भयंकर प्लान आखला. हा कट इतका धूर्त होता की हत्येला रस्ते अपघाताचे रूप देण्याची तयारी होती. मात्र वेळीच पतीच्या हाती दोघांचे गुप्त चॅट लागले आणि त्याने ताबडतोब पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसात तक्रार दाखल

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, डोरनाकल मंडळातील चिलकोड गावचे रहिवासी जी. राजेश्वर राव यांचा विवाह २०१६ मध्ये सूर्यपेट जिल्ह्यातील मट्टमपल्ली मंडळाच्या राघवपुरम येथील भवानीशी झाला होता. दोघांना दोन मुली आहेत. राजेश्वर राव खम्मममधील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करतात.

राजेश्वर राव यांनी पोलिसांना सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पत्नीच्या वर्तनात बदल जाणवत होता. चौकशी केल्यावर त्यांना कळले की भवानीची ओळख खम्मममध्येच कुरिअर डिलिव्हरी एजंट म्हणून काम करणाऱ्या सैदुलूशी झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री अवैध संबंधांत बदलली. पतीच्या गैरहजेरीत सैदुलू अनेकदा त्यांच्या घरी ये-जा करत होता असा आरोप केला आहे.

व्हॉट्सअॅप चॅट पाहून धक्काच बसला

पतीला पत्नीच्या अफेअरचा संशय होताच, पण राजेश्वर यांच्या हाती पत्नी भवानी आणि सैदुलू यांच्यातील संभाषणाचे (व्हॉट्सअॅप चॅट) पुरावे लागले तेव्हा त्यांना धक्काच बसला. चॅटमध्ये भवानी आणि सैदुलू पती राजेश्वर राव यांची हत्या करण्याचा प्लान आखत होते. एका मेसेजमध्ये भवानीने कथितरीत्या सैदुलूला सांगितले होते की जर त्याने तिच्या पतीला ठार मारले तर दोघे कायमचे एकत्र राहू शकतील. इतकेच नव्हे, तर खूनाला कोणत्याही कटाऐवजी साध्या ‘रोड अॅक्सिडंट’ (रस्ते अपघात) चे रूप देण्याबाबत चर्चा झाली होती.

चॅटचे स्क्रीनशॉट घेऊन घरातून पळाला

स्वतःचा आणि दोन निरागस मुलींच्या जिवाचा धोका लक्षात घेऊन राजेश्वर राव ताबडतोब डोरनाकल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरातील संपूर्ण संभाषणाचे स्क्रीनशॉट व इतर पुरावे पोलिसांकडे सुपूर्द करत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन डोरनाकल पोलिसांनी तात्काळ झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल केली आहे. घटनाक्षेत्र खम्ममचे असल्याने पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी प्रकरण खम्मम रुरल पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. पोलिस आता चॅटची फॉरेन्सिक तपासणी करण्याची आणि आरोपींकडून चौकशी करण्याची तयारी करत आहेत.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत