पाकिस्तानचे F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन स्क्वाड्रनमध्ये दाखल

श्रीनगर : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अद्ययावत F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरमधील आपल्या स्क्वाड्रनमध्ये दाखल झाले आहेत. मागील महिन्यात अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांना भारताकडे सोपवण्यात आले होते. दरम्यान, अभिनंदन यांना आरोग्याचा मुद्दा विचारात घेत 4 आठवड्यांच्या सुट्टीवर पाठवण्यात आले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनंदन यांनी आपल्या सुट्टीच्या …

Wing Commander Abhinandan Vardhaman, पाकिस्तानचे F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन स्क्वाड्रनमध्ये दाखल

श्रीनगर : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अद्ययावत F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरमधील आपल्या स्क्वाड्रनमध्ये दाखल झाले आहेत. मागील महिन्यात अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांना भारताकडे सोपवण्यात आले होते.

दरम्यान, अभिनंदन यांना आरोग्याचा मुद्दा विचारात घेत 4 आठवड्यांच्या सुट्टीवर पाठवण्यात आले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनंदन यांनी आपल्या सुट्टीच्या वेळेत चेन्नईमधील घरी जाण्याऐवजी श्रीनगरमधील स्क्वाड्रनमध्ये थांबण्यास पसंती दिली आहे. विंग कमांडर वर्धमान आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी चेन्नईला जाण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी श्रीनगरला आपल्या स्क्वॉड्रनमध्येच राहण्यास प्राधान्य दिले. आरामासाठीची सुट्टी संपल्यानंतर एक वैद्यकीय पथक अभिनंदन यांची तंदुरुस्ती तपासेल. यात ते पुन्हा युद्धविमान चालक म्हणून कामावर रुजू होऊ शकतात, की नाही याची चाचपणी केली जाईल.

अभिनंदनने स्वतः कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधून भारतात परतल्यानंतर सुरक्षा संस्थांनी अभिनंदनकडून झालेल्या घटनाक्रमाची पूर्ण माहिती घेतली होती. यात जवळजवळ 2 आठवडे गेले होते. त्यानंतरच अभिनंदन यांना आरामासाठी सुट्टीवर पाठवण्यात आले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *