AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेडफोन लावून खेळत होता PUBG, अचानक वाढलं ब्लड प्रेशर, ब्रेन हॅमरेजने तरूणाचा मृत्यू

PUBG गेमच्या व्यसनामुळे 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री गेम खेळत असताना त्याचा रक्तदाब अचानक 300 वर पोहोचला, ज्यामुळे ब्रेन हॅमरेज झालं. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेडफोन लावून खेळत होता PUBG, अचानक वाढलं ब्लड प्रेशर, ब्रेन हॅमरेजने तरूणाचा मृत्यू
गेमिंगच्या व्यसनामुळे तरूणाचा मृत्यू
| Updated on: Feb 09, 2026 | 1:38 PM
Share

के-पॉप कल्चरचं वेड, मोबाईलचं व्यसन यामुळे गेल्या आठवड्यात तीन मुलींनी जीव दिला. मोबाईलच्या ॲडिक्शनमुळे तरूणांचे जाणारे जीव हे देशातील भयानक परिस्थिती समोर येत आहे. त्यातच अनेकांना मोबाईल गेमिंगच व्यसनही लागलेलं आहे. मात्र हीच सवय किती जीवघेणी ठरू शकते, त्याचं डोळे उघडणारं, जळजळीत उदाहरण समोर आलं आहे. मेरठमधून एक भयानक प्रकार समोर आला आहे. गाझियाबादमध्ये तीन बहिणींच्या आत्महत्येनंतर आता मेरठच्या खैरनगर भागात PUBG गेमच्या व्यसनाने 22 वर्षीय तरुण मोहम्मद कैफचा जीव घेतला आहे. रात्री उशीरापर्यंत गेम खेळणाऱ्या तरूणाचं ब्लड प्रेश इतकं प्रचंड वाढलं की त्याच्या डोक्यातील नसाच फुटल्या.

मेरठमधील खैरनगर गुलर वाली गली येथील रहिवासी असलेल्या फारूख हे प्रॉपर्टी डीलर होते. त्यांचा एकुलता एक मुलगा मोहम्मद कैफ (वय 22) हा शुक्रवारी रात्री त्याच्या खोलीत हेडफोन लावून मोबाईल फोनवर PUBG गेम खेळत होता. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, कैफ याला गेल्या चार महिन्यांपासून ऑनलाइन गेमिंगचे वेड लागलं होतं. शुक्रवारी रात्री पहाटे 3च्या सुमारास, तो गेम खेळत असताना अचानक बेडवरून पडला.

आवज ऐकून घरातले लोक त्याच्या रूममध्य पोहोचले, तेव्हा कैफ याची प्रकृती खूप नाजूक, गंभीर बनली होती. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा तै अगदी हैराण झाले, कारण कैफचं ब्लड प्रेशर प्रचंड वाढलं होतं ते डायरेक्ट 300 वर पोहोचलं

उपचारांदरम्यान मृत्यू

त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला ताबडतोब दिल्लीला रेफर केले. दिल्लीतील रुग्णालयात दोन दिवस मरणाशी झुंज दिल्यानंतर रविवारी सकाळी कैफचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, जास्त ताण आणि उत्साहामुळे त्याचा रक्तदाब खूप वाढला, ज्यामुळे ब्रेन हॅमेरज (मेंदूतील नस फुटणे) झालं आणि हेच मृत्यूचे मुख्य कारण ठरलं.

रील बनवण्याचं वेड, मग गेमचं व्यसन लागलं

त्याच्या मृत्यूमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला, त्याचे वडील तर अगदी कोलमडून गेले. त्याच्या वडिलांच्या सांगण्यानुसार, त्याच्या मुलाला पूर्वी सोशल मीडियावर रील्स बनवण्याची आवड होती. पण गेल्या काही महिन्यांपासून तो PUBG गेमच्या इतका अधीन झाला होता की, त्याला व्यसनच लागलं होतं. तो रात्र-रात्र जागून गेम खळत बसायचा. आई-वडील, नातेवाईक सर्वांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला,पण खेळाच्या वेडापुढे त्याने कोणाचंच काहीच ऐकलं नाही.

कैफ हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबावर मोठा आघात झाला. एकुलत्या एका मुलाच्या निधनामुळे पालक कोलमडून पडले आहेत. रडून रडून त्यांची अवस्था वाईट झाली. ऑनलाइन गेममुळे तरुणांच्या मेंदूत ‘डोपामाइन’ची पातळी वाढते, ज्यामुळे त्याचे व्यसन लागतं असं मानसशास्त्रज्ञ सांगतात.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात