Dhruv Rathee : ध्रुव राठीविरोधात वॉरंट जारी! 2018 चं ते प्रकरण अखेर बाहेर आलं, कोर्टाचा मोठा निर्णय
न्यायालयाने हा आदेश देण्याआधी विकास पांडे यांच्या वकिलांनी काही गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ध्रुव राठीला अगोदर जुलै 2019 रोजी समन्स जारी करण्यात आले होते.

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने सीजेपीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. विशेष म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो परदेशातून थेट भारतात आलाय. दरम्यान, या आंदोलात सहभागी झाल्यानंतर ध्रुव राठीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. आता त्याचे एक जुने प्रकरण समोर आले असून या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. या वॉरंटनंतर ध्रुव राठीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
समोर आलेल्या माहितीनुसार समोर आलेले हे प्रकरण 2018 सालचे आहे. तेव्हा भाजपाच्या आयटी सेलचे सदस्य असलेल्या विकास पांडे यांनी अब्रुनुकसानीची एक तक्रार दाखल केली होती. ध्रूव राठीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. याच व्हिडीओवर आक्षेप घेत विकास पांडे यांनी मानहानी झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 31 ऑक्टोबर रोजी आहे. ध्रुव राठीविरोधात जारी करण्यात आलेले वॉरंट हे जामीनपात्र आहे.
2019 सालीदेखील जारी केले होते समन्स
न्यायालयाने हा आदेश देण्याआधी विकास पांडे यांच्या वकिलांनी काही गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ध्रुव राठीला अगोदर जुलै 2019 रोजी समन्स जारी करण्यात आले होते. आता याच प्रकरणात त्याच्याविरोधात नवे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेच. या प्रकरणावर पुढील कारवाई 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ध्रुव राठीची नवी घोषणा
दरम्यान, ध्रुव राठी सध्या लंडनमध्ये पोहोचला आहे. आता लंडनमध्ये जंतर-मंतर होणार, असं त्यानं जाहीर केलं. ‘अॅक्शनचा ग्लोबल डे आला आहे. लंडनमध्येच जंतर-मंतर होणार,’ असं ध्रुव राठीने आपल्या इन्स्ट्राग्राम स्टोरी ठेवली आहे. हे आंदोलन 17 ऑक्टोबर 2026 रोजी होणार असल्याचे ध्रुव राठीने सांगितले आहे. तसेच मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहनही त्याने केलेय. त्यामुळे हे आंदोलन किती मोठे होणार? किती लोक सहभागी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
