AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zomato | महिलेचं नाक फोडल्याच्या प्रकरणाला नवं वळण, डिलीव्हरी बॉयचा धक्कादायक दावा

कामराज असं त्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयचं नाव आहे त्यानं याप्रकरणी वेगळाच दावा केला आहे. Zomato delivery boy beaten woman case

Zomato | महिलेचं नाक फोडल्याच्या प्रकरणाला नवं वळण, डिलीव्हरी बॉयचा धक्कादायक दावा
कामराज, झोमॅटो डिलीव्हरी बॉय
| Updated on: Mar 12, 2021 | 11:50 AM
Share

बंगळुरु: झोमॅटो (zomato) अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने शेअर केला होता. पोलिसांनी त्या डिलीव्हरी बॉयला अटक केली असून झोमॅटोनं त्याला कामावरुन देखील हटवलं आहे. कामराज असं त्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयचं नाव आहे त्यानं याप्रकरणी वेगळाच दावा केला आहे. ऑर्डर पोहोचवण्यास उशीर झाल्यानं सबंधित महिलेने शिवीगाळ करत चप्पलनं मारहाण केल्याचा दावा डिलीव्हरी बॉयनं केला आहे. Zomato delivery boy beaten woman case new facts delivery boy claimed first woman hit him

डिलीव्हरी बॉयचा दावा काय?

डिलीव्हरी बॉयनं त्या महिलेच्या घरी पोहोचून ऑर्डर दिली आणि पैसे मिळण्याची वाच पाहत होतो. संबंधित महिलेने कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय स्वीकारला होता. ऑर्डर पोहोचवण्यासाठी उशीर झाल्यानं त्या महिलेची माफी मागितली होती तरी त्या रागावलेल्या होत्या, असं कामराज यानं सांगतिलं. ट्रॅफिक जास्त असल्यानं आणि रस्ता खराब असल्यानं पोहोचण्यास उशीर झाल्याचं सांगितलं. महिलेनं पार्सल घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला होता आणि त्या झोमॅटो चॅट सपोर्टशी बोलत होत्या. कामराज यांनं सांगितलक की त्या महिलेने झोमॅटो सपोर्टशी बोलताना ऑर्डर रद्द केली. ऑर्डर रद्द केल्यानंतर ती परत देण्यास नकार दिला. यांनतर बिल्डींगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास त्या महिलेने चप्पलनं मारहाण केली आणि स्वत:च्या अंगठीनं नाकावर मारुन घेत जखम केली. कामराज यानं ही बाजू द न्यूज मायन्यूट यापोर्टलशी बोलताना मांडली आहे.

महिलेची बाजू नेमकी काय?

बंगळुरुमध्ये संबंधित महिलेने झोमॅटो या अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर केले होते. निश्चित वेळेत जेवणाची ऑर्डर न आल्याने महिलेने झोमॅटोच्या कस्टमर केअरमध्ये फोन केले. तसेच ऑर्डर वेळेवर न आल्यामुळे या महिलेने मागवलेल्या जेवणाची ऑर्डर कॅन्सल केली. ही महिला जेव्हा झोमॅटोच्या कस्टमर केअरशी बोलत होती, त्याच वेळात एक डिलीव्हरी बॉय जेवण द्यायला आला. महिलने हे जेवण घेण्यास नकार दिला. ऑर्डर केलेले जेवण नाकारल्यामुळे या महिलेवर डिलीव्हरी बॉय चिडला. त्याने महिलेशी हुज्जत घालणे सुरु केले. डिलीव्हरी बॉयने मागवलेले जेवण महिलेच्या घरात घुसून ठेवून दिले. या प्रकाराचा महिलेने विरोध केल्यामुळे रागात येऊन डिलीव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर मारले. या हल्ल्यात महिलेच्या नाकाला जबर मार लागला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले, असा दावा त्या महिलेने केला आहे.

व्हिडीओ पोस्ट करुन कारवाईची मागणी

महिलेने एक व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आणि व्हिडीओमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रसंग तिने सांगतिला. संबंधित महिलेने डिलीव्हरी बॉयवर कडक कारवाई करण्याची मागणी केली यानंतर महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची बंगळुरु पोलिसांनी दखल घेतली आणि कामराज या डिलीव्हरी बॉयला अटक केली. झोमॅटोनेसुद्धा या प्रकाराची दखल घेत आगामी काळात असे प्रकार खडणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच मारहाण झाल्यामुळे माफी मागत महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी झोमॅटोने दाखवली आहे.

संबंधित बातम्या:

ऑर्डर कॅन्सल केली म्हणून डिलीव्हरी बॉय भडकला, रागाच्या भरात महिलेचं फोडलं नाक

(Zomato delivery boy beaten woman case new facts delivery boy claimed first woman hit him)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.