ऑर्डर कॅन्सल केली म्हणून डिलीव्हरी बॉय भडकला, रागाच्या भरात महिलेचं फोडलं नाक

झोमॅटो अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलिव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केली. (zomato delivery bitten women bangalore nose)

ऑर्डर कॅन्सल केली म्हणून डिलीव्हरी बॉय भडकला, रागाच्या भरात महिलेचं फोडलं नाक
महिलेवर अशा प्रकारे हल्ला करण्यात आला.

बंगळुरु : ऑनलाईन शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. शॉपिंगसोबतच आजकाल खाद्यपदार्थसुद्धा ऑनलाईन मागवले जातात. घरपोच सेवा असल्यामुळे हा पर्याय अनेकांना सोपा आणि सोयिस्कर वाटतो. मात्र, ऑनलाई जेवण मागवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. झोमॅटो (zomato) अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे नाक फुटले. हा सर्व प्रकार खुद्द महिलेने व्हिडीओ शेअर करुन सांगितला आहे. (zomato delivery boy bitten women in bangalore and broke her nose)

नेमका प्रकार काय?

बंगळुरुमध्ये एका महिलेने झोमॅटो या अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर केले होते. निश्चित वेळेत जेवणाची ऑर्डर न आल्याने महिलेने झोमॅटोच्या कस्टमर केअरमध्ये फोन केले. तसेच ऑर्डर वेळेवर न आल्यामुळे या महिलेने मागवलेल्या जेवणाची ऑर्डर कॅन्सल केली. ही महिला जेव्हा झोमॅटोच्या कस्टमर केअरशी बोलत होती, त्याच वेळात एक डिलीव्हरी बॉय जेवण द्यायला आला. महिलने हे जेवण घेण्यास नकार दिला. ऑर्डर केलेले जेवण नाकारल्यामुळे या महिलेवर डिलीव्हरी बॉय चिडला. त्याने महिलेशी हुज्जत घालणे सुरु केले. डिलीव्हरी बॉयने मागवलेले जेवण महिलेच्या घरात घुसून ठेवून दिले. या प्रकाराचा महिलेने विरोध केल्यामुळे रागात येऊन डिलीव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर मारले. या हल्ल्यात महिलेच्या नाकाला जबर मार लागला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले.

महिलेने व्हिडीओ पोस्ट करुन तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला, पाहा व्हिडीओ :

 

व्हिडीओ पोस्ट करुन कारवाईची मागणी

हल्ला करुन फरार झाल्यानंतर या महिलेने एक व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रसंग तिने सांगतिला आहे. तसेच या महिलेने डिलीव्हरी बॉयवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महिलेचा वैद्यकीय खर्च उचलण्याचे झोमॅटोचे आश्वसन

दरम्यान, महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची बंगळुरु पोलिसांनी दखल घेतली. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तसेच, झोमॅटोनेसुद्धा या प्रकाराची दखल घेत आगामी काळात असे प्रकार खडणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच मारहाण झाल्यामुळे माफी मागत महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी झोमॅटोने दाखवली आहे.

इतर बातम्या :

प्रेमापाई वेडेपणा ! दोन्ही भावांचं एकाच मुलीवर प्रेम, परस्पर सहमतीने रेल्वे ट्रॅकसमोर आत्महत्या

VIDEO : गाडी नो पार्किंगला लाऊन पोलिसांशी हुज्जत, महिला SI ने कानशिलात लगावली

डफलीच्या साथीला एकतारीची धून, व्हायरल व्हिडीओने पंतप्रधानांचं लक्ष वेधलं, मोदी म्हणतात…

(zomato delivery boy bitten women in bangalore and broke her nose)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI