AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डफलीच्या साथीला एकतारीची धून, व्हायरल व्हिडीओने पंतप्रधानांचं लक्ष वेधलं, मोदी म्हणतात…

सोशल मीडियावर दररोज अनेक असे व्हिडीओ फिरत असतात ज्यात लोक आपला (Viral Video Of Two Folk Singers) टॅलेंट दाखवत असतात.

डफलीच्या साथीला एकतारीची धून, व्हायरल व्हिडीओने पंतप्रधानांचं लक्ष वेधलं, मोदी म्हणतात...
singer viral video
| Updated on: Mar 10, 2021 | 3:31 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक असे व्हिडीओ फिरत असतात ज्यात लोक आपला (Viral Video Of Two Folk Singers) टॅलेंट दाखवत असतात. यामध्ये काही असाधारण व्हिडीओ असे असतात जे लोकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रीट्वीट केलं आहे. पीएम मोदींनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे, त्यामुळे हा व्हिडीओची चर्चा होत आहे (PM Narendra Modi Retweeted The Viral Video Of Two Folk Singers).

पंतप्रधानांकडून लोकगायकांचं कौतुक

या व्हिडीओमध्ये दोन तरुण लोकगायक भगवान महादेवावर आधारित लोक गीत गात आहेत. यापैकी एक लोकगायक एकतारी वाजवत आहे तर दुसरा डफली वाजवतो आहे. हा व्हिडीओ तैमूर का जीजा नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडीओला रीट्वीट करत लिहीलं, “बहुत बढ़िया.” यानंतर या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही लोकगायकांचं भरभरुन कौतुक केलं जातं आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 40 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. तर 8 हजारपेक्षा जास्त लोकांनी रीट्वीट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात ओआणि नेहमी लोकांच्या संपर्कात राहतात.

नरेंद्र मोदींवर आणखी एक सिनेमा

यापूर्वी बातमी आली होती की त्यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा बनतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम यांच्यावर आधारित सिनेमा “एक और नरेन”च्या निर्मितीला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिनेमात गजेंद्र चौहान मुख्य भूमिकेत आहेत. गजेंद्र चौहान यांनी प्रसिद्ध टीव्ही सीरिअल “महाभारत”मध्ये युधिष्ठीरची भूमिका साकारली होती.

सिनेमा निर्माते मिलन भौमिक यांनी गुरुवारी पीटीआई-भाषाला सांगितलं की, “एक और नरेन”ची कहाणी दोन भागात असेल, एकमध्ये नरेंद्रनाथ दत्त यांच्या रुपात स्वामी विवेकानंद यांची कार्य आणि जीवन दाखवलं जाईल. तर, दुसऱ्या भागात नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोण दाखवण्यात आला आहे (PM Narendra Modi Retweeted The Viral Video Of Two Folk Singers).

मिलन भौमिक यांनी सांगितलं की या सिनेमाचं शूटिंग 12 मार्चपासून सुरु होईल. हे शूटिंग गुजरात आणि कोलकात्यामध्ये होणार आहे. सिनेमा एप्रिलमध्ये पूर्ण होईल आणि याला पंतप्रधानस नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सिप्टेंबरला प्रदर्शित केली जाईल. तर अभिनेता गजेंद्र चौहानने सांगितलं की ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या 20 वर्षांपासून ओळखतात.

PM Narendra Modi Retweeted The Viral Video Of Two Folk Singers

संबंधित बातम्या :

Viral Video : सोशल मीडियावर रंगलं दोन महिलांचं भांडण; हा व्हिडीओ पाहिलात?

मच्छिमाराच्या जाळ्यात शार्क अडकला, इतक्यात मगरीचा हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

दिल्ली पोलिसांवरही ‘पावरी गर्ल’चा जादू, छापेमारीनंतर व्हायरल झालं गमतीशीर ट्वीट

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.